भारत-पाकिस्तान सामन्यातून मिळालेले पैसे भाजप पहलगाम पीडितांना देणार का? सौरभ भारद्वाज यांचा सवाल
New Delhi: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये काल आशिया कप 2025 चा फायनलचा सामना पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी करत विजय मिळवला. भारताचे संघाने पाकिस्तानला या स्पर्धेमध्ये तिसऱ्यांदा पराभूत करून आशिया कप २०२५ चे जेतेपद नावावर केले आहे. पण या सामन्यांवरून आम आदमी पक्षाने नेते सौरभ भारद्वाज यांनी सामन्यांतून मिळणाऱ्या उत्पन्नांवरच प्रश्न उपस्थित केले आहे.
सौरभ भारद्वाज यांनी त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले आहे की, “केवळ भारत-पाकिस्तान सामन्यांमधून मिळणारा एकूण महसूल ४९० कोटी ते ६३० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. जर ते पैसे पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांमध्ये वाटले तर प्रत्येक कुटुंबाला १९-२५ कोटी रुपये मिळतील. भाजप सरकार तो निधी देणार का?” असा सवाल भारद्वाज यांनी उपस्थित केला आहे.
पण भारद्वाज यांच्या ट्विटमध्ये ‘पहलगाम’ या शब्दाऐवजी ‘पहलवान’ असा उल्लेख करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या नेत्याला हे देखील माहित नाही की दहशतवादी हल्ला पहलवानमध्ये नाही तर पहलगाममध्ये झालाय, असा प्रतिक्रीयाही युजर्सकडून उमटू लागल्या आहेत. त्यामुळे हा शब्द त्यांनी जाणीवपूर्वक लिहीला की नजरचुकीने असाही प्रश्न उपस्थित केला आहेत.
आप आमदार सौरभ भारद्वाज यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला आव्हान दिले होते. , “जर तुमच्यात आणि बीसीसीआय-आयसीसीमध्ये धाडस असेल तर क्रिकेट व्यवसायातून होणारे प्रसारण हक्क, जाहिरातींचे उत्पन्न हे शहीदांच्या विधवांना दान करा. फक्त बोलण्याने उपयोग नाही.”
दरम्यान, दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून भारताने आशिया कप २०२५ जिंकला. यानंतर सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर जाहीर केले की, या संपूर्ण स्पर्धेतील त्याची मॅच फी भारतीय सैन्य आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना दान करणार आहे. तसेच, आपले शूर सशस्त्र दल आणि पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबांना ही मदत समर्पित करतो. ते नेहमीच माझ्या स्मरणात राहतील.”
Asia Cup 2025 Final : सूर्या दादा मानलं तुला…आशिया कपमधील सर्व कमाई भारतीय सैन्याला केली दान
सूर्यकुमारच्या या निर्णयाकडे भारद्वाज यांनी दिलेल्या आव्हानाला दिलेले उत्तर म्हणून पाहिले जात आहे. अनेकांनी या कृतीचे कौतुक केले आहे. मात्र, भारद्वाज यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केला आहे की, “फक्त खेळाडूंचे योगदान पुरेसे नाही. भाजप सरकार भारत–पाकिस्तान सामन्यांमधून मिळणारे एकूण उत्पन्न पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांना देईल का?” असा सवाल त्यांनी यामुळे या प्रकरणावरून राजकीय वाद रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.