Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GDP Growth Rate: देशाचा खरा विकासदर ७.७ टक्के नव्हे, तर केवळ २.७ टक्केच ! माजी अर्थमंत्र्यांचा खळबळजनक दावा

GDP Growth- परिस्थिती आणि सरकारी आकडेवारीमध्ये ४ ते ५ टक्क्यांची तफावत असल्याचा दावा करत त्यांनी म्हटले की, चुकीच्या आकडेवारीवर आधारित धोरणे कधीच प्रभावी ठरू शकत नाहीत.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 17, 2026 | 12:16 PM
Government Data,real GDP growth 2.7 percent

Government Data,real GDP growth 2.7 percent

Follow Us
Follow Us:
  • देशाची खरी आर्थिक स्थिती आणि विश्वासार्ह आकडेवारी जनतेसमोर येत नाही- यशवंत सिन्हा
  • देशाचा वास्तविक विकासदर ७.७ टक्के नसून, केवळ २.७ टक्क्यांच्या आसपास – यशवंत सिन्हा
  • सरकारी आकडेवारीमध्ये ४ ते ५ टक्क्यांची तफावत – यशवंत सिन्हा
GDP Growth Rate: देशाची खरी आर्थिक स्थिती आणि विश्वासार्ह आकडेवारी जनतेसमोर येत नसल्याने अर्थव्यवस्थेचे अचूक विश्लेषण व योग्य धोरणनिर्मिती अशक्य होत असल्याची टीका भारताचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली. केंद्र सरकारकडून सादर केली जाणारी आर्थिक आकडेवारी दिशाभूल करणारी असून, देशाचा वास्तविक विकासदर (GDP) ७.७ टक्के नसून, केवळ २.७ टक्क्यांच्या आसपास असल्याचा दावा त्यांनी केला.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ‘आजची भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावरील विशेष चर्चासत्रात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. सिन्हा यांनी देशाच्या आर्थिक आकडेवारीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सांगितले की, नोव्हेंबर २०२५ मध्ये जागतिक नाणेनिधीने भारताच्या आर्थिक माहिती संकलन पद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत ‘सी’ ग्रेड दिली होती.

Inflation News: महागाई गगनाला, सरकार राजकारणात मग्न

आकडेवारीत ४ ते ५ टक्क्यांची तफावत

वास्तविक परिस्थिती आणि सरकारी आकडेवारीमध्ये ४ ते ५ टक्क्यांची तफावत असल्याचा दावा करत त्यांनी म्हटले की, चुकीच्या आकडेवारीवर आधारित धोरणे कधीच प्रभावी ठरू शकत नाहीत. गेल्या १२ वर्षांतील आर्थिक स्थितीचा आढावा घेताना त्यांनी देशांतर्गत बचत आणि गुंतवणूक जीडीपीच्या सुमारे ३३ टक्क्यांवर स्थिर असल्याचे सांगितले. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्ट सरकार मांडत असले, तरी त्यासाठी सातत्याने किमान ८ टक्के विकासदर आवश्यक असल्याचे त्यानी नमूद केले.

Rain Update : केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल होऊन वाटचाल ठप्पच; देशभरात पावसाची मोठी तूट

अमेरिकेच्या टेरीफ धोरणावरील मौन चुकीचे

शेती आणि परराष्ट्र धोरणावर भाष्य करताना ‘एल निनो च्या प्रभावामुळे यंदा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील संकटाकडे लक्ष वेधले. तसेच अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेल्या अतिरिक्त शुल्काविरोधात केंद्र सरकारने ठोस भूमिका घेतली नसल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी पुणे पूर्व विभाग काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, नीलिमा सिन्हा, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस गटनेते चंदुशेठ कदम, प्रवक्ते गोपाळ तिवारी, सुनील शिंदे, दीपाली डोख आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

Web Title: Yashwant sinha claims india real gdp growth rate only 2 7 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • GDP
  • Indian Economy
  • pune news
  • Yashwant Sinha

संबंधित बातम्या

पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सुरू;  रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा
1

पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सुरू; रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा

नाशिक फाटा-खेड उन्नत मार्गाला प्रशासकीय ‘ब्रेक’; केंद्र सरकारचा थेट प्रकल्प गुंडाळण्याचा इशारा
2

नाशिक फाटा-खेड उन्नत मार्गाला प्रशासकीय ‘ब्रेक’; केंद्र सरकारचा थेट प्रकल्प गुंडाळण्याचा इशारा

Inflation News: महागाई गगनाला, सरकार राजकारणात मग्न! मे महिन्यात घाऊक महागाईचा दर ४३ महिन्यांच्या उच्चांकावर
3

Inflation News: महागाई गगनाला, सरकार राजकारणात मग्न! मे महिन्यात घाऊक महागाईचा दर ४३ महिन्यांच्या उच्चांकावर

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी करणार आंदोलन; 29 जूनपासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा
4

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी करणार आंदोलन; 29 जूनपासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.