फोटो - टीम नवराष्ट्र
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ हे त्यांच्या तडकाफडकी निर्णयासाठी ओळखले जातात. त्यांच्याकडून केली जाणारी अन्याय करणाऱ्यांच्या अनाधिकृत बांधकामांवरील बुलडोझर कारवाई ही तर देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी मोठी कारवाई केली आहे. लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते मोईद खान यांच्यावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. तसेट महिलांची छेड काढणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात आलेली आहे.
उत्तर प्रदेशमधील एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. यामध्ये पाण्यामधून गाडीवर जाणाऱ्या तरुणीची अनेक तरुण मुलं छेड काढत होती. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर योगी सरकारने गांभीर्याने कारवाई केली आहे. यामध्ये तरुणांसह परिसरातील पोलिस स्टेशनवर देखील कारवाई झाली आहे. यामध्ये घटनास्थळाच्या जवळील गोमतीनगर हे संपूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड करण्यात आले आहे. तसेच डीएसपी, एडीएसपी आणि एसीपी यांच्या तात्काळ बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील महिलांची सुरक्षा आपली प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर बीएनएस सेक्शन 191 (2), 3 (5), 272, 285 आणि 74 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्यावर देखील तडक कारवाई करण्यात आलेली आहे. 2 ऑगस्ट रोजी अयोध्यामध्ये अल्पवयीन बलात्कार प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी दोन महिन्यांपूर्वी 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. या मुलीच्या वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी गरोदर असल्याचे समोर आल्याने या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत योगी सरकारने कारवाईचे आश्वासन पीडित मुलीच्या घरांच्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासन आरोप समाजवादी पक्षाचे नेते मोईद खान यांच्या निवासस्थानी पोहोचले. आरोपींच्या घरांवर बुलडोझरसह कारवाई करण्यात आली. त्यामुळे युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार तत्पर असल्याचे पुन्हा एकदा दाखवले आहे.