सौजन्य- सोशल मिडिया
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबांनी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न १२ जुलैला होणार आहे. यानिमित्ताने काल २ जुलैला अंबानी परिवाराकडून ५५ जोडप्यांचा सामूहिक विवाह आयोजित केला होता. आज ३ जुलैला मामेरु कार्यक्रम पार पडला आणि लग्नसंमारंभास सुरुवात झाली अजून ९ दिवसानंतर १२ जुलैला हा लग्नसोहळा संपन्न होणार आहे. त्यादरम्यान अनेक विधी, कार्यक्रम असणार आहे.
अनंत राधिकाचा रोका ते लग्न यामध्ये कोण कोणते समारंभ, पार्टी झाल्या याविषयी
रोका
काही वर्षांपासून एकमेकांना ओळखल्यानंतर 2022 मध्ये अनंत आणि राधिकाचा रोका सोहळा पार पडला. तो त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत राजस्थानच्या नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात पार पडला. नाथव्दारा येथील श्रीनाथजी हे वैष्णव संप्रदायाकरिता सर्वात महत्वाचे मंदिर आहे.
साखरपुडा
अनंत आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा १९ जानेवारी २०२३ रोजी मुंबईमध्ये पार पडला.त्या कार्यक्रमास गोल धना म्हटले जाते. हा गोलधना संमारंभ अंबानी यांच्या अॅटेलिया या निवासस्थानी पार पडला.
लगन लखवानू
यावर्षी जामनगरमध्ये १६ जानेवारी रोजी त्यांच्या ‘लगन लखवानू’ समारंभ पार पडला. या समारंभात लग्नाची पहिली आमंत्रण पत्रिका देवाला प्रतीक म्हणून अर्पण केली जाते.
पहिले प्री वेंडिग
जामनगर येथे १ ते ३ मार्चला अनंत आणि राधिकाचा यांचे पहिले प्री वेंडिग पार पडले. जगविख्यात गायक रिहाना,एकोन दिलजित सह अन्य कलाकारांनी आपली कला सादर केली. या समारंभास बिल गेट्स आणि मार्क झुकेरबर्ग जगातील श्रीमंत व्यावसायिकांनी उपस्थिती लावली होती. अख्ख बॉलीवूडच या पार्टीला उपस्थित होते. सोशल मिडियावर या कार्यक्रमाची चर्चा पुढे ५ ते ६ दिवस होती.
दुसरे प्री वेडिंग
दुसरी प्री-वेडिंग पार्टी २९ मे ते १ जून रोजी लक्झरी क्रूझवर झाले. या क्रुझमधून इटली ते फ्रान्सपर्यंत प्रवास केला होता. यावरील कार्यक्रमाचे नाव ‘ला विटा ई अन विएजिओ’ असे ठेवण्यात आले होते, याचा इंग्रजीतील अर्थ ‘लाइफ इज अ जर्नी’ असा होतो. सुमारे ८०० हून जास्त पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. यात प्रामुख्याने बॉलीवूडच्या सेलिब्रिटींचा समावेश होता.
हा लग्नसोहळा त्यातील कार्यक्रमांमुळे, सेलेब्रिटींच्या उपस्थितीमुळे त्यातील झालेल्या खर्चामुळे गाजलाच. तसाच तब्बल दोन वर्षासाठी हा लग्नसोहळा पार पडला म्हणूनही चर्चेत राहिला आहे.