अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा झुंड (Jhund) सिनेमा आज रिलीज झाला आहे आणि या सिनेमाच्या पडद्यामागच्या एक एक गोष्टी आता समोर येत आहेत. खरंतर या सिनेमाची कथा आधी नागराजने आमीर खाननला ऐकवली आमीर (Amir Khan) ही कथा ऐकून इतका भारावून गेला की लागलीच त्याने मिस्टर बच्चन यांची भेट घेऊन त्यांना हा सिनेमा करण्याची शिफारस केली. हा सिनेमा त्यांनी का करावा या सिनेमातून जगासमोर काय येणार आहे हे नागराजचं व्हिजन आमीरने नेमक्या शब्दांत बिग बींसमोर मांडलं आणि त्यांनाही ते पटलं.
याबद्दल पुष्टी करताना अमिताभ बच्चन म्हणाले की, “मला आठवते जेव्हा मी आमिरशी याविषयी चर्चा केली होती; त्याने मला मी हा चित्रपट करायलाच हवा असे सांगितले. आणि जेव्हा आमिर एखाद्या गोष्टीची शिफारस करतो तेव्हा काय होते हे तुम्हाला माहिती आहे.”
अलीकडेच, आमिरने एका स्पेशल स्क्रिनिंगमध्ये हा काळजाला हात घालणारा चित्रपट पाहिला ज्यामुळे तो भावनिक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. एका आघाडीच्या पोर्टलवर चित्रपटाचे कौतुक करताना त्याने नमूद केले होते, “हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. हे अविश्वसनीय आणि खूप अनोखे आहे आणि ते कसे घडले ते मला कळत नाही. मी भारावून गेलो आहे आणि हा चित्रपट मला बाहेर पडू देत नाहीए. माझ्याकडे शब्द नाहीत कारण हा एक अतिशय आश्चर्यकारक चित्रपट आहे. 20-30 वर्षात या चित्रपट उद्योगात मी जे काही शिकलो आहे ते सर्व हा चित्रपट तोडून टाकतो.”
आमिर पुढे म्हणतो की, “अमिताभ बच्चन यांनी जबरदस्त काम केले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट केले आहेत पण हा त्यांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक आहे; त्यांच्या महान चित्रपटांपैकी एक आहे.”