बीड हत्या प्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे;सरपंच संघटनेकडून निषेध
सिंधुदुर्ग: बीडयेथील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्यातील सरपंचांनी धरणे आंदोलन छेडले आहे. बीडमध्ये घडलेली घटना निंदनीय असून त्याचा आम्ही निषेध करतो. या हत्या प्रकरणामुळे सरपंच धास्तावले आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अद्यापही दोषींवर कारवाई झाली नाही. आरोपीला अद्याप अटक झालेली नसून सदर घटना राज्याच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेचा निषेध म्हणून आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच संघटनेने सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सदर प्रकरणात न्याय मिळावा यासाठी माजी सरपंच व अन्य पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले बीड सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करा या मागणी सह विविध घोषणा देखील देण्यात आल्या.
यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांच्या या प्रकरणामुळे भावना दुखावल्या असून याबाबतशासन स्तरावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांनाही याबाबतची निवेदने पाठविण्यात आली आहेत. सदर घटनेचा सरपंच संघटनेच्या झालेल्या एका बैठकीत निषेध नोंदवत आला व त्यानंतर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गवस यांनी निवेदन सादर केले. यावेळी कसाल सरपंच राजन परब सरपंच संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष लता खोत झरेबाबर सरपंच अनिल शेटकर मोरगाव सरपंच संतोष आईर रानबाबुळी सरपंच परशुराम परब ओरोस सरपंच आशा मुरमूरे उपसरपंच पांडुरंग मालणकर फुकेरी सरपंच निलेश आईरबांदिवडे सरपंच अरविंद साटम पांगरड सरपंच कावेरी चव्हाण येरवडे तर्फ मानगाव सरपंच श्रिया ठाकूर सोनवडे तर्फ हवेली सरपंच नाजुका सावंत कोळब सरपंच श्रिया धुरी आंबडोस .सरपंच सुबोधनी परब तारकर्ली सरपंच मृणाली मयेकर वांयंगवडे सरपंच विशाखा सकपाळवायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे साळेल सरपंच रवींद्र साळकर देवबाग सरपंच आणि मालवण तालुका सचिव उल्हास तांडेल ओवळीये सरपंच रंजना पडवळ मुटापुरी सरपंच बाळकृष्ण गावकर गावराई सरपंच सोनल शिरोडकर गुळवंत सरपंच सुभाष लाड माजी सरपंच कुंदे सचिन कदम बाळा कोरगावकरआदीसह उपस्थित होते.
Ramgiri Maharaj : “त्या रामगिरीला जोड्याने मारण्याची वेळ आली..”; वादग्रस्त विधानावरुन राजकारण रंगलं
या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सरपंच संघटना एकवटल्या असून अशा प्रकारचे प्रकार जिल्ह्यात घडू नये, या दृष्टीने शासनाने गांभीर्याने सरपंचांना सुरक्षा द्यावी. बीड सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशा विविध मागण्यांबाबत घोषणा देण्यात आल्या. निवेदन सादर करून जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी शासन स्तरावर पाठविले जाईल, असे आश्वासन दिले त्यानंतर सरपंच संघटनेच्या वतीनेमुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही निवेदन सादर केले आहे.