मागील काही दिवसांपासून कोरोनाचा (Corona Spread) प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडलेत. टिव्ही मालिकांतील प्रसिद्ध चेहरा अभिनेत्री गौतमी देशपांडेला (Gautami Deshpande Tested Corona Positive) कोरोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्रामवरून (Instagram Post By Gautami Deshpande) तिने याबाबतची माहिती दिली आहे.
कोरोनाची लागण झाली असल्याचं गौतमीने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून सांगितलं आहे. कोरोनाप्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही मला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेऊ नका. हा काळ कठीण आहे. त्यामुळे घराबाहेर पडू नका. घरी रहा, सुरक्षित रहा, असं गौतमीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
[read_also content=”महेश मांजरेकरांचा ‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, अश्लिलतेचा ठपका ठेवत शिवसेनेची चित्रपट बंदीची मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/shivsena-demand-ban-on-nay-varan-bhat-loncha-kon-nay-koncha-movie-nrsr-222186/”]
गौतमी पुढे म्हणते, ‘लस घ्या. मला मान्य आहे की लस घेऊनही कोरोनाची लागण होते. पण लस घेतलेल्यांना कोरोनाचा त्रास कमी जाणवतोय. त्यामुळे लवकरात लवकर लस घ्या. स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. घरी रहा सुरक्षित रहा’.