पंचायतच्या तिसऱ्या सीझनमध्ये नीना गुप्ता ‘मंजू देवी’ची भूमिका पुन्हा साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘पंचायत 3’ 28 मे रोजी प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीमध्ये नीना गुप्ताने आपल्या आयुष्यातील अनेक पैलूंबद्दल सांगितले. लोक तिला इंडस्ट्रीमध्ये अनेकदा ‘बंडखोर स्टार’ आणि ‘बोल्ड अभिनेत्री’ म्हणतात, मात्र ही तिच्या संदर्भातील व्याख्या तिच्याशी अजिबात जुळत नसल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले.
नीनाने नुकतेच तिचे जुने दिवस आठवले आणि ‘मला काम हवे’ या पोस्टनंतर तिच्या आयुष्यात काय बदल घडले हेदेखील यावेळी सांगितले. नीनाने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत आणि एक वेळ अशी होती की, तिच्याकडे काम नव्हते आणि तिने बिनधास्तपणे सोशल मीडियावर याबाबत ‘मला काम हवे’ असे लिहिले होते आणि त्यानंतर तिचे नशीब कसे बदलले याबाबत तिने सांगितले आहे. (फोटो सौजन्य – Instagram)
अनेकदा मुंबई सोडण्याचा विचार
नीना गुप्ता 1982 पासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे आणि अप्रतिम अभिनेत्री म्हणून त्यांच्या नावाची नेहमीच चर्चा असते. मात्र, अभिनेत्री म्हणून तिचे सुरुवातीचे दिवस सोपे नव्हते. ‘बधाई हो’ स्टारने ती आपल्या बॅग पॅक करून दर तीन महिन्यांनी मुंबई सोडण्याची आठवण यावेळी तिने सांगितली. ती म्हणाली, ‘मी दिल्लीहून आले होते, त्यामुळे मुंबई हे सुरुवातीला मला फारच अवघड शहर वाटले. दर तीन महिन्यांनी मला माझ्या वस्तू पॅक करून परत जावेसे वाटायचे. माझे शिक्षण चांगले झाले होते त्यामुळे विचार करायचे की, ‘मी जाऊन पीएचडी करेन. मी आता इथे नाही राहू शकत. पण मुंबई हे असे शहर आहे की, ज्या दिवशी मी विचार केला की मी उद्या जाणार आहे तर त्याच रात्री मला उद्या काहीतरी काम मिळेल असे वाटायचे आणि मग मी जाऊ शकले नाही.’
[read_also content=”दीपिकाचा पिवळाधम्मक ड्रेस, अदांनी केलं घायाळ https://www.navarashtra.com/gallery/mom-to-be-deepika-padukone-is-going-viral-fans-are-shocked-to-see-in-her-yellow-dress-537757/”]
पैशांसाठी केल्या खराब भूमिका
नीना गुप्ताचा प्रवास प्रेरणादायी तर आहेच, पण त्यात चढ-उतारही आहेत. अभिनेत्री म्हणते की ती शेवटी तिच्या आयुष्यातील अशा ठिकाणी आहे जिथे ती भूमिका करायला नाही म्हणू शकते. ‘हिशेबाच्या गरजेमुळे हे बदलले आहे. प्रथम, पैसे आवश्यक होते. जास्त पैसे मिळवण्यासाठी खूप वाईट गोष्टी कराव्या लागल्या. हा पिक्चर रिलीज होऊ नये म्हणून मी अनेकवेळा देवाकडे प्रार्थना करायचे. पण आज मी अशा भूमिकांना नाही म्हणू शकते, हे मी पूर्वी कधीच सांगू शकले नाही.’ ती म्हणाली की, मला जी स्क्रिप्ट आवडते, जी भूमिका मला आवडते, ती मी करते आणि जे आवडत नाही ते मी करत नाही.
‘बोल्ड अभिनेत्री’ ठप्प्याबद्दल काय म्हणाली?
नीना गुप्ता म्हणाल्या की, तिला ‘बोल्ड’ आणि ‘विद्रोही स्टार’ अशी टायटल देण्यात आली होती, पण मी ते मान्य करत नाही. मला बंडखोर का म्हणतात? मी एका गरीब माणसाची भूमिकाही केली आहे. त्याचबरोबर मी कोणतीही दमदार भूमिका किंवा ग्लॅमरस भूमिका केलेली नाही. मला वाटते की मी सिंगल मदर असल्यामुळे मीडियाने माझी प्रतिमा तयार केली आहे म्हणून मला माझ्यावर हा ठप्पा लागला आहे.
एका मुलाखतीचा उल्लेख करत म्हणाली की, जेव्हा मी मरेन, तेव्हा पण हेच म्हटलं जाईल की, ‘बोल्ड नीना गुप्ता आता राहिली नाही, त्यानंतरही ते मला सोडणार नाहीत. त्यामुळे ठीक आहे, मला या गोष्टीची अजिबात पर्वा नाहीये’
‘मला काम पाहिजे’ने काय बदललं?
बॉलीवूड लाईफशी संवाद साधताना नीना गुप्ता यांनी सांगितले की, तिच्या पोस्टवरून काय बदलले? ‘माझी पोस्ट खूप गाजली, पण त्यानंतरही मला काम मिळाले नाही. मला फक्त छोट्या भूमिका मिळाल्या, ज्या मला पूर्वीही मिळायच्या. ‘बधाई हो’ नंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. मला या ट्वीटवरून कोणतेही काम मिळाले नाही, केवळ निंदनीय प्रकारची प्रसिद्धी मिळाली. पण मला ‘बधाई हो’ नंतर काम मिळाले. हा चित्रपट आपल्यासाठी टर्निंग पॉईंट ठरल्याचेही तिने आर्वजून सांगितले.