Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, EVM मध्ये कचाकचा बटण दाबा नाहीतर…

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. प्रत्येकवेळी त्यांनी केलेली विधाने राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहेत. मात्र त्यांचा हा स्वभाव त्यांना कधींना कधी अडचणीत आणू शकतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 17, 2024 | 03:09 PM
अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, EVM मध्ये कचाकचा बटण दाबा नाहीतर…
Follow Us
Close
Follow Us:

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. प्रत्येकवेळी त्यांनी केलेली विधाने राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहेत. मात्र त्यांचा हा स्वभाव त्यांना कधींना कधी अडचणीत आणू शकतो. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे इंदापूरच्या सभेत अजित पवार यांनी केले वक्तव्य. अजित पवार म्हणाले, आम्ही तुम्हाला निधी देतो, त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं पटापट दाबा. तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या.

अजित पवार म्हणाले, आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामांसाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा… ,म्हणजे मला निधी देण्यासाठी बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल.

कार्यकर्त्यांना आदेश द्याचे नसतात, त्यांना सांभाळावं लागत- अजित पवार

जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा तेव्हा मी काम केली आहेत. मला काम करायला आवडत.मला आदेश देण्याची सवय झाली आहे, म्हणून मी अधिकाऱ्यांना आदेश देतो. पण आपल्या कार्यकर्त्यांना आदेश द्याचा नसतो. कार्यकर्त्यांना आदेश दिला तर ते मलाच घरीच बसवतील. कार्यकर्त्यांशी नीट बोलावं लागत त्यांना सांभाळावे लागते,असे अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मी ४० वर्षांपासून उमेदवाराला ओळखतो आहे. मी ४० वर्षांपासून ओळखते ते कुठेही ढवळाढवळ करत नाहीत. ते तुम्हाला बाहेरचे वाटणार नाहीत. ते तुम्हाला आपले वाटतील. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करत असताना नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर ठेवून मतदान करावे.

मी शब्दाचा पक्का आहे – अजित पवार

पदावर काम करण्याची संधी मिळाली तर पुढच्या २० ते २५ वर्षांचा विचार करून काम करू. माझ्या बारामतीमध्ये सुद्धा ३८२ कोटी एवढी मंजुरी देऊ शकलो नाही पण इंदापूरमध्ये दिली. मी शब्दाचा पक्का आहे. मी महिन्यातून एक दिवस कामाचा आढावा घेण्यासाठी काढेन. तसेच आम्ही जो उमेदवार दिला आहे तो देखील काम करेल, असे अजित पवार म्हणाले.

Web Title: Ajit pawars statement sparks debate in political circles press the black button in evm or else loksabha election nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2024 | 03:09 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • BJP
  • election 2024

संबंधित बातम्या

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन
1

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

Satara News: मतचोरीचे वादळ महाराष्ट्रापर्यंत; मतदार याद्यांमधील बोगस नावांवरून सातऱ्यात काँग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप
2

Satara News: मतचोरीचे वादळ महाराष्ट्रापर्यंत; मतदार याद्यांमधील बोगस नावांवरून सातऱ्यात काँग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra 1st Conclave : महाराष्ट्र ‘ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ बनू शकेल का? मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्लॅन? वाचा सविस्तर
3

Maharashtra 1st Conclave : महाराष्ट्र ‘ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ बनू शकेल का? मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्लॅन? वाचा सविस्तर

Pune Civic Poll Row:  पुणे महापालिकेतील प्रभागरचनेवरून महायुतीत मिठाचा खडा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर नाराजी
4

Pune Civic Poll Row: पुणे महापालिकेतील प्रभागरचनेवरून महायुतीत मिठाचा खडा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.