फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस १८ : बिग बॉस १८ चा हा नवा सिझन सध्या प्रचंड चर्चेत आहे. टेलिव्हिजनच्या वादग्रस्त रिॲलिटी शोमध्ये सध्या मागील आठवड्यापासून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मागील आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक वाद पाहायला मिळाले. या आठवड्यात नुकताच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये नवा ट्विट आणला आहे. कालच्या भागामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये कमी राशन मिळाल्यामुळे स्पर्धक प्रचंड त्रासले आहेत. त्यामुळे बिग बॉस १८ चे सर्व स्पर्धक जेवणासाठी बिग बॉसकडे आठवड्याच्या राशनची मागणी करत होते.
यावेळी बिग बॉसने घरच्यांना लिव्हिंग रूममध्ये बोलावले नाही सांगितले की जर भूतकाळमध्ये झालेल्या गोष्टींपैकी तुम्हाला एक काही तरी करावे लागणार आहे तेव्हाच तुम्हाला आम्ही राशन देणार आहोत. यामध्ये बिग बॉसने स्पर्धकांसमोर दोन ऑप्शन ठेवले पहिला ऑप्शन होता की हेमा आणि तिजिंदर बग्गा यांना जेलमधून काढण्यासाठी मी जे राशन दिले होते ते तुम्हाला मिळू शकते. परंतु त्यासाठी तुम्हाला दोन सदस्यांना पुन्हा जेलमध्ये टाकावे लागणार आहे. तर दुसरा पर्याय असा होता की मागच्या आठवड्यामध्ये जे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नोमिनेट झाले होते त्यांच्यामधील एकही सदस्य घराबाहेर गेला नाही, त्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये नोमिनेट झालेल्या सदस्यांपैकी एक सदस्य घराबाहेर जाईल.
यानंतर घराचे आपली मतं मांडतात आणि त्यानंतर सर्वाधिक मते ही अविनाश मिश्रा, तिजींदर बग्गा, चाहत पांडे आणि मुस्कान बामणे यांची होती. यामध्ये श्रुतिका अर्जुन उठते आणि म्हणते की आपल्याकडे चार नाव आहेत आपल्याला दोन नाव हवी आहेत आणि ती मतमोजणी करायला सुरुवात करते, तर बोलत असताना अविनाश येतो आणि म्हणतो की तू हे नाही करू शकत. यावर दोघांचा वाद पाहायला मिळतो. त्यानंतर मग सगळेजण अविनाशला सांगतात की ठीक आहे तू कर मतमोजणी त्यानंतर अफ्रीन खान आणि अविनाश यांच्यामध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळतो. त्यानंतर चुमने वादामध्ये येऊन अविनाशला काही अपशब्द बोलले त्यामुळे तो आणखी भडकला आणि तो चुमच्या अंगावर धावून येत होता. त्यानंतर अविनाश आणि घराच्या सदस्यांमध्ये मोठे वाद आणि वाक्य युद्ध पाहायला मिळालं आता बिग बॉस १८ च्या सिझनमधून मोठी अपडेट समोर आली आहे.
बिग बॉसच्या घरामधून अविनाश मिश्रा घराबाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे. कालच्या भागामध्ये अविनाश मिश्राचे वाद पाहायला मिळाले त्यानंतर त्याला आता घराबाहेर काढण्यात आले आहे अशी माहिती समोर आली आहे. बिग बॉसने अविनाशला घराबाहेर काढल्यानंतर आता त्याला पुन्हा शोमध्ये पुन्हा घेतले जाते की त्याला कायमचे घराबाहेर काढले जाणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.