इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (फोटो- सोशल मीडिया)
आज इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये सुरू आहे सामना
न्यूझीलंडसाठी करो या मरो स्थिती
सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी वाढली रस्सीखेच
आज इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील महत्वाचा सामना सुरू आहे. सुपर 8 मधील आजच्या सामन्याकडे महत्वाचा म्हणून पाहिले जात आहे. त्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 159 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी 160 धावांची गरज असणार आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा नृणे घेतला होता.
न्यूझीलंडकडून फिलिप्सने 39 आणि टीम सिफर्टने 35 धावांची खेळी केली. सुरुवातीस रचीन रवींद्र 11 धावा करून बाद झाला. तर मार्क चॅपमेनने देखील 15 धावा केल्या. तर इंग्लंडकडून आदिल रशीद, विल जॅक्स, रहमान अहमदने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर लियाम डॉसनला 1 विकेट मिळाली.
राचीन रवींद्र सामन्याआधी काय म्हणाला होता?
रवींद्र म्हणाला, “अशा सामन्यात नेहमीच आत्मविश्वास असतो, विशेषतः जेव्हा आपल्याला माहित असते की खेळपट्टी कशी असेल. पण मला वाटते की कोणत्याही वेळी इंग्लंडला कमी लेखणे मूर्खपणाचे ठरेल.” तो म्हणाला, “ते निश्चितच खूप चांगले संघ आहेत. त्यांचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत आणि त्यांच्याकडे क्रमवारीत जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत.” पण रवींद्रला पूर्ण जाणीव आहे की शुक्रवार हा एक नवीन दिवस आहे आणि न्यूझीलंड संघासाठी एक नवीन आव्हान असेल. रवींद्र म्हणाला, “श्रीलंकेविरुद्धच्या विजयाने आमचे मनोबल वाढले आहे, परंतु आम्हाला हे चांगले समजले आहे की दोन दिवसांत आम्हाला एका वेगळ्या आव्हानाचा सामना करावा लागेल. आशा आहे की, आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार असू.”
सेमीफायनलपूर्वी वाढली धाकधूक!
टी-२० विश्वचषक २०२६ मधील (T20 World Cup 2026) सर्वात मोठा सामना १ मार्च रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील हा सामना तांत्रिकदृष्ट्या ‘उपांत्यपूर्व फेरी’ मानला जात आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. मात्र, या हायव्होल्टेज लढतीपूर्वी एक अशी आकडेवारी समोर आली आहे, ज्याने भारतीय चाहत्यांची चिंता वाढवली आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात वेस्ट इंडिजचे पारडे भारतापेक्षा जड असल्याचे दिसून येत आहे.






