कल्याण/डोंबिवली : कॅन्सर म्हणजेच कर्करोग या आजाराविषयी समाज अधिक सतर्क व्हावा यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या ‘बालाजी आंगन काॅम्पलेक्स’ने (Balaji Aangan Complex) पुढाकार घेतला आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवात त्यांनी ‘टाटा मेमोरिअल हॉस्पिटल’ (Tata Memorial Hospital) ची उभारणी केली आहे. ‘बालाजी आंगन कॉम्प्लेक्स’चं गणेशोत्सवाचं यंदाचं सातवं वर्ष आहे.
कॅन्सरविषयी जनजागृती आणि टाटा मेमोरिअल रुग्णालयाचा देखावा साकारण्यासाठी तेजस सौंदणकर, दिव्यांश सिंघ, स्वप्नील घाडी, राहुल दळवी, मंगेश तेली या कलाकारांनी उभा केला आहे. या कलाकारांना विनय हडकर, हिमांशू ढंग, प्राजक्ता केळुस्कर, यशश्री राऊत, सोनाली उकर्डे , विशाल साळवे, प्रथमेश मेस्त्री, शुभम सावंत यांनी मेहनत घेतली आहे.
[read_also content=”ब्राझीलच्या अँटोनीसाठी मँचेस्टर युनायटेड मोजणार ७५० कोटी https://www.navarashtra.com/sports/manchester-united-will-pay-750-crores-for-brazils-antony-321310.html”]
याविषयी बालाजी आंगन गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख प्रवीण केळुस्कर सांगतात, “दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही देखाव्यातून सामजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. यावर्षी आम्ही कॅन्सर या आजारावर आरास उभी करून कॅन्सरबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत. आज हा आजार बहुतेक लोकांच्या घरी आहे. पण या आजारावरचे उपचार मर्यादित हॉस्पिटलमध्ये होतात. मुख्य म्हणजे त्या आजारावर उपचार करण्यासाठी टाटा हाॅस्पिटलचं योगदान खरंच मोलाचं आहे. सर जेआरडी टाटांच्या विचारांना मानवंदना म्हणून आम्ही टाटा मेमोरिअल हॉस्पिलची उभारणी देखाव्यामध्ये केली आहे. हा देखावा उभा करण्याची संकल्पना ही रुपेश राऊत, अभिजित बिल्ले, सुशांत भोवड, ओमकार वायंगणकर यांची आहे. ”
“टाटा मेमोरिअल हॉस्पिटलने लाखो कॅन्सर या आजाराने बाधीत रुग्णांना जीवनदान दिलं आहे. कॅन्सरचे उपचार समान्य माणसांना परवडतील असे हे एकमेव हॉस्पिटल अहे. कल्याणसह डोंबिवलीत अशा एका हॉस्पिटलची खरच खूप गरज आहे; जेणे करून भविष्यात कसारा-कर्जत-नाशिकडून येणाऱ्या रुग्णांसाठीसाठी हे एक मध्यवर्ती ठिकाण बनेल”, असं कॉम्प्लेक्सच्या गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख प्रवीण केळुस्कर म्हणाले.