फोटो सौजन्य: Pinterest
मीडिया रिपोर्टनुसार, या अपडेटेड सेडानच्या इंटिरिअरची झलक आधीच समोर आली आहे. नव्या Verna मध्ये केबिन डिझाइन अधिक आधुनिक आणि आकर्षक करण्यात आले आहे. सेडान खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी इंटिरिअरला विशेष महत्त्व असते, कारण इंजिन आणि किंमत जवळपास सारखी असली तर ग्राहक केबिनचा लूक आणि फीचर्स पाहून निर्णय घेतात.
‘या’ एक गोष्टीमुळे Hyundai Creta वर Tata Sierra भारी! किमतीत खूप मोठे अंतर
नव्या Verna फेसलिफ्टमध्ये स्टिअरिंग व्हीलचे डिझाइन बदलण्यात आले आहे. स्पाय फोटोंनुसार यात दोन-स्पोक असलेले स्टीयरिंग व्हील दिले जाणार असून त्याचा रिम गोलाकार आणि साध्या, स्वच्छ डिझाइनचा आहे. स्टिअरिंगवरील स्विचेसही स्लिम आणि मिनिमल ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे कारला मॉडर्न लुक मिळतो.
दुसरीकडे, Volkswagen Virtus आणि Skoda Slavia मध्ये जाड रिम आणि रुंद स्पोक्स असलेले स्टिअरिंग दिले जाते, जे ड्रायव्हिंगदरम्यान मजबूत पकड आणि स्पोर्टी फील देते. नवीन Verna चे केबिन अधिक टेक्नॉलॉजी-केंद्रित असेल, जे शहरातील वापरासाठी विशेष आकर्षक ठरू शकते.
Verna फेसलिफ्टमध्ये मोठा सिंगल ग्लास पॅनल देण्यात येणार आहे, ज्यामध्ये इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एकत्रित असतील. हा डिझाइन कारला अधिक प्रीमियम लुक देतो. केबिनमध्ये ब्लॅक थीमसह रेड ॲक्सेंट्सही दिसू शकतात, ज्यामुळे आतील वातावरण अधिक स्टायलिश वाटेल. Virtus आणि Slavia मध्येही स्क्रीन उत्तमरीत्या बसवण्यात आल्या आहेत, मात्र Verna चे नवीन लेआउट अधिक आधुनिक दिसते.
Triber आणि Ertiga झाले सावध! उद्या भारतात Nissan ची ‘ही’ MPV लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स
इंजिन पर्यायांमध्ये फारसा बदल अपेक्षित नाही. यात 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन उपलब्ध राहतील. तसेच मॅन्युअल आणि डीसीटी गिअरबॉक्सचे पर्यायही दिले जातील. सध्या Verna ची किंमत 10.80 लाख रुपयांपासून 17.13 लाख रुपयांपर्यंत आहे. फेसलिफ्टनंतर किंमतीत सुमारे 20,000 ते 50,000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. तरीही ती Virtus आणि Slavia ला जोरदार स्पर्धा देऊ शकते.






