Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ओ अनिलबाबू, चौकशीचे आदेश हायकोर्ट देते आणि तुम्ही…”; देशमुखांवर चित्रा वाघांचा जोरदार हल्लाबोल

महाविकास आघाडीचे सरकार असताना गृहमंत्री असणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गिरीश महाजन यांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दवाब टाकल्याचा आरोप करत सीबीआयने देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 10, 2024 | 06:25 PM
"ओ अनिलबाबू, चौकशीचे आदेश हायकोर्ट देते आणि तुम्ही...''; देशमुखांवर चित्रा वाघांचा जोरदार हल्लाबोल

"ओ अनिलबाबू, चौकशीचे आदेश हायकोर्ट देते आणि तुम्ही...''; देशमुखांवर चित्रा वाघांचा जोरदार हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याने गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेमुळे मला कधीही अटक होऊ शकते असा मोठा दावा शरद पवार गटाचे नेते व आमदार अनिल देशमुख यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना एकच उधाण आले आहे. यावर आता भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

ओ अनिलबाबूऽऽऽऽऽ. 4 वर्षांपूर्वीची घटना कुणीही उकरुन काढली नाही, ते तुमचे कर्म आहे. सारे पुरावे विधानसभेच्या रेकॉर्डवर आहेत.
माध्यमांकडेही त्याचे व्हीडिओ आहेत. ज्या अधिकार्‍यावर तुम्ही दबाव टाकला, त्या अधिकार्‍यानेच जबाब दिला आहे.. कर्म तुम्ही कराल आणि दोष आमच्या नेत्यांवर टाकाल, हे चालणार नाही. सरकारी वकील कट रचतो,गृहमंत्री एसपींवर दबाव टाकतात,त्याचे स्टींग सभागृहात येते, सीबीआय चौकशीचे आदेश हायकोर्ट देते आणि तुम्ही देवेंद्रजी फडणवीसांवर आरोप करणार? संवैधानिक प्रक्रियेचा आणखी किती अपमान करणार..? त्यापेक्षा गिरीश महाजन तुम्हाला भेटले तेव्हा तुम्ही कुणाचा दबाव आहे आणि म्हणून मला खोटा गुन्हा दाखल करावाच लागेल हे सांगितले होते हे एकदा सांगून टाका. आहे हिंमत….

ओ अनिलबाबूऽऽऽऽऽ @AnilDeshmukhNCP 4 वर्षांपूर्वीची घटना कुणीही उकरुन काढली नाही, ते तुमचे कर्म आहे… सारे पुरावे विधानसभेच्या रेकॉर्डवर आहेत.
माध्यमांकडेही त्याचे व्हीडिओ आहेत.
ज्या अधिकार्‍यावर तुम्ही दबाव टाकला, त्या अधिकार्‍यानेच जबाब दिला आहे..
कर्म तुम्ही कराल आणि दोष… https://t.co/IuDs2gx9aI — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 10, 2024

हेही वाचा: ‘देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने मला कधीही अटक होऊ शकते’; बड्या नेत्यांचा खळबळजनक दावा

अनिल देशमुखांचे ट्विट काय होते?

देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षा पुर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे. 4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे. माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकुन मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत.ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरुण महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगु ईच्छीतो की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे.

सीबीआयकडून गुन्हा दाखल

महाविकास आघाडीचे सरकार असताना गृहमंत्री असणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गिरीश महाजन यांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दवाब टाकल्याचा आरोप करत सीबीआयने देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर देशमुखांची ट्विट केले होते.

हेही वाचा: CBI कडून देशमुखांविरुद्ध ‘या’ प्रकरणात गुन्हा दाखल; माजी गृहमंत्री म्हणाले, फडणवीसांकडून…

”धन्यवाद…देवेंद्रजी फडणवीस. माझ्यावर #CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता – न डगमगता मी #BJP च्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे. महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे !”, असे ट्विट देशमुखांची केले होते.

 

Web Title: Bjp chitra wagh reply to anil deshmukhs allegations on devendra fadanvis in cbi case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 06:22 PM

Topics:  

  • anil deshmukh
  • CBI
  • chitra wagh

संबंधित बातम्या

How to Join CBI: ट्विशा शर्मा मृत्यू सत्र आणि नीट पेपरफुटीचा तपास करणाऱ्या ‘CBI’ मध्ये नोकरी कशी मिळवायची? काय आहे प्रक्रिया?
1

How to Join CBI: ट्विशा शर्मा मृत्यू सत्र आणि नीट पेपरफुटीचा तपास करणाऱ्या ‘CBI’ मध्ये नोकरी कशी मिळवायची? काय आहे प्रक्रिया?

Twisha Sharma Case: समर्थ सिंगच्या अडचणीत वाढ; तब्बल इतके दिवस झाली CBI कोठडीत रवानगी
2

Twisha Sharma Case: समर्थ सिंगच्या अडचणीत वाढ; तब्बल इतके दिवस झाली CBI कोठडीत रवानगी

NEET Paper Leak: नीट पेपर लीक प्रकरणात ११ वी अटक, पुण्यातून मनीषा हवालदारला CBI च्या बेड्या
3

NEET Paper Leak: नीट पेपर लीक प्रकरणात ११ वी अटक, पुण्यातून मनीषा हवालदारला CBI च्या बेड्या

NEET 2026मध्ये पुन्हा धक्कादायक खुलासा! केमिस्ट्री, बायोलॉजीसह फिजिक्सचा पेपरही लीक
4

NEET 2026मध्ये पुन्हा धक्कादायक खुलासा! केमिस्ट्री, बायोलॉजीसह फिजिक्सचा पेपरही लीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.