सोलापूर : सोलापूर शहरातील पार्क चौक येथे संविधान भवनचे उद्घाटन झाले. व्यासपीठवर आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवर टीका करत नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान ही अनमोल देणगी दिली आहे. आणि केंद्रातील भाजप आणि नरेंद्र मोदी यांमुळे संविधान आणि देशाची लोकशाही धोक्यात आली आहे अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यासपीठावर बोलताना केली आहे(BJP threatens democracy; MLA Praniti Shinde’s attack).
भारतात आता लोकशाही धोक्यात आली आहे. जात पात करणाऱ्या मोदी किंवा भाजपा सरकारने भारत देशात एक प्रकारचा खतरा निर्माण केला आहे. देशाची लोकशाही टिकवावी असेल तर तरुणांनी शेवटच्या श्वाशा पर्यंत लोकशाहीसाठी लढणे गरजेचे आहे. डॉ आंबेडकर यांच्या जयंती आणि पुण्यतिथी पर्यंत मर्यादित न राहता शेवट पर्यंत लढून ही लोकशाही टिकवावी लागेल.
आता राज्यकर्ते काहीही करू शकणार नाहीत जनताच यांना जागा दाखवून देईल असा विश्वास काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.सोलापूर शहरातील मुख्य चौकात संविधान भवन उभारणार सोलापूर शहरातील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या पार्क चौक येथे संविधान भवन साकारणार आहे. पालकमंत्री दत्ता भरणे, आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते याचे भूमीपूजन झाले.
या कार्यक्रमासाठी बहुजन समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही नेत्यांनी श्रेय घेण्यासाठी या कार्यक्रमाला विरोध केला होता, पण पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करून हे कार्यक्रम यशस्वी केले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक चेतन नरोटे आदी उपस्थित होते.
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]