पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये पुरंदर विमानतळाचा वाद चव्हाट्यावर आलेला आहे. जमीन हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस जमीन मोजणी केली जात होती, त्यावेळेस सात गावातील शेतकऱ्यांनी या विमानतळाला कसून विरोध केला. त्यानंतर प्रशासनाकडून त्यांच्यावरती लाठीचार सुद्धा करण्यात आलेला होता. याच्या बातम्या माध्यमांवरती प्रसिद्ध झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी जमीन हस्तगत करण्यासाठी ही मोजणी सुरू नसून फक्त मोजणी प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु शेतकऱ्यांनी मोजणीला देखील विरोध केला. हेच शेतकरी आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. चार गावातील जमीन मोजणी ही पूर्ण झाली असून काही गावांमधील मोजणी अजूनही बाकी आहे. शेतकऱ्यांनी ड्रोनच्या माध्यमातून होणाऱ्या मोजणीला देखील विरोध केला आहे. “तुम्ही ड्रोन ने आभाळातून मोजणी करता विमानतळ देखील आभाळातच उभारा!” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या शेतकऱ्यांनी कायदेशीर सल्लागार म्हणून एडवोकेट असीम सरोदे यांच्याशी देखील चर्चा केली आहे. शेतकऱ्यांचा विरोध नेमका का आहे? त्यांचे म्हणणे काय आहे?