भिवंडीतील धामणकर नाका परिसरातील एम. डी. धाब्याच्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या आदेशानंतरही महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. तालुका उपाध्यक्ष अविनाश दामोदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनपा मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तात्काळ निष्कासन कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली असून, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.