फोटो सौजन्य - Social Media
युनियन बँक ऑफ इंडियाने या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. लोकल बँक ऑफिसरच्या पदासाठी या भरतीला सुरुवात झाली आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती संदर्भात सखोल माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. अद्याप या भरती संदर्भात आयोजित केले जाणाऱ्या निवड प्रक्रियेच्या परीक्षेची तारीख कळवण्यात आली नाही. २४ ऑक्टोबरपासून, एकंदरीत, आजपासून उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. उमेदवारांना हे अर्ज नोव्हेंबरच्या १३ तारखेपर्यंत करता येणार आहे.
हे देखील वाचा : झेल एज्युकेशनतर्फे विशेष गोलमेज परिषद संपन्र ! फायनान्स एज्युकेशनच्या भविष्याबाबत करण्यात आली चर्चा
युनियन बँक ऑफ इंडियातर्फे आयोजित या भरतीच्या प्रक्रियेमध्ये लोकल बँक ऑफिसरच्या १५०० रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. जनरल, EWS तसेच OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करताना ८५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना भारटोसाठी १७५ रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. तसेच PWD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी १७५ रुपये अर्ज शुल्क म्हणून भरायचे आहे. अर्ज शुल्काची भरपाई ऑनलाई पद्धतीने करायचे आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर काही अटी शर्तीना पात्र असणे अनिवार्य आहे. या अटी शर्ती अर्ज कर्त्या उमेदवाराच्या शिक्षणासंबंधित आहेत. तसेच एका ठराविक वयोगटातील उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकंदरीत, किमान २० वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा : CBSE ने जाहीर केली डेट शीट २०२५; ‘या’ तारखेला घेतल्या जातील परीक्षा
उमेदवारांची पाच टप्प्यांमध्ये नियुक्ती केली जाईल.