युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा (Photo Credit- AI)
मंगळवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराण आता वाटाघाटी करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, अमेरिकेने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. ट्रम्प म्हणाले, “इराणने आता चर्चेची तयारी दर्शवली आहे, पण मी त्यांना सांगितले आहे की आता खूप उशीर झाला आहे. ज्या सरकारकडून गेल्या ४७ वर्षांपासून अमेरिकन नागरिकांवर हल्ले केले जात आहेत, त्या ‘सैतानी’ राजवटीचा खात्मा करण्याची ही शेवटची संधी होती.”
🇺🇸#MUNDO #CHTV AHORA: Trump sobre Irán: Su defensa aérea, su Fuerza Aérea, su Marina y su liderazgo han desaparecido. Quieren hablar. Dije: “¡Demasiado tarde!” pic.twitter.com/rRtbPZUe8Q — CHTV HONDURAS (@ChtvH3124) March 3, 2026
इराणवर करण्यात आलेल्या या भीषण लष्करी कारवाईचे समर्थन करताना ट्रम्प यांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. “इराण अशा क्षेपणास्त्रांची निर्मिती करत होता जी थेट अमेरिकेपर्यंत धडक देऊ शकत होती. ही कट्टरवादी राजवट अण्वस्त्रांच्या हट्टावर ठाम होती आणि अमेरिकेसाठी तो एक गंभीर धोका होता. युरोप आणि इतर परदेशांतील अमेरिकन तळांना लक्ष्य करण्याची क्षमता इराणकडे आधीच होती, पण त्यांच्या मुख्य भूमीला धोका निर्माण होण्यापूर्वीच आम्ही ही कारवाई केली आहे,” असे ट्रम्प यांनी नमूद केले.
इराणविरुद्ध सुरू असलेल्या या लष्करी मोहिमेबद्दल माहिती देताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका आपल्या नियोजित वेळेपेक्षा बरेच पुढे आहे. “या मोहिमेला कितीही वेळ लागला तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. ही लढाई प्रदीर्घ चालली तरी आम्ही कंटाळणार नाही. आम्ही इराणला वेळोवेळी इशारा दिला होता, पण त्यांनी तो गांभीर्याने घेतला नाही. गरज पडल्यास आम्ही आमचे पायदळ देखील मैदानात उतरवू,” अशी कडक चेतावणी ट्रम्प यांनी दिली आहे.
सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका आणि इस्रायलचे हे ‘जॉइंट ऑपरेशन’ अत्यंत अचूकपणे सुरू आहे. “आम्ही इराणला पूर्णपणे कुचले असून त्यांच्यावर जबरदस्त हल्ले केले जात आहेत. मात्र, अद्याप सर्वात मोठे हल्ले होणे बाकी आहे. अमेरिकेचे सैन्य हे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य असून आम्ही त्याचा प्रभावीपणे वापर करत आहोत,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. सध्याच्या परिस्थितीत इराण एकाकी पडताना दिसत असून, ट्रम्प यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मध्य पूर्वेतील भौगोलिक-राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






