पाकिस्तान : पाकिस्तान कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दुसऱ्या लाटेत कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या परिवरातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दाऊदच्या परिवरात कोरोनाची दहशत पसरली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेला व्यक्ती दाऊद इब्राहिमचा पुतण्या आहे. त्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सिराज कासकर याला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर कराचीमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच्यावर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत सिराज दाऊदचा मोठा भाऊ साबिर कासकरचा मुलगा आहे.
[read_also content=”मनसेचे खळ्ळखट्याक सुरु, …आणि ॲमेझॉनचे ऑफीस मनसे कार्यकर्त्यांनी फोडले https://www.navarashtra.com/latest-news/mns-riots-erupt-and-amazon-office-blown-up-by-mns-activists-69101.html”]
पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरिद्री पाकिस्तानची आरोग्य सेवा कोलमडली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याने सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही आहे.
[read_also content=”पालींचा पाऊस पडणार असल्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा, फ्लोरिडावासियांवर अजब संकट https://www.navarashtra.com/latest-news/warning-to-citizens-as-iguanas-rains-a-strange-crisis-on-florida-residents-69080.html”]