दीप्ती शर्माने केला नवा रेकॉर्ड (फोटो- ians)
दीप्ती शर्माने मोडला झूलन गोस्वामीचा रेकॉर्ड
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये घेतल्या सर्वाधिक विकेट्स
भारताचा नेदरलँड्सवर ९५ रन्सने विजय
India W Vs Nedarlands W Updates: काल आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यामध्ये महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने नेदरलँड्सवर ९५ रन्सने विजय मिळवला आहे. भारताने या स्पर्धेत आपला दूसरा विजय साकारला आहे. तर नेदरलँड्सचा सलाग दूसरा पराभव झाला आहे. मात्र या सामन्यात दीप्ती शर्माने नवा रेकॉर्ड रचला आहे.
काल भारताने प्रथम फलंदाजी करून नेदरलँड्सला २१० रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र नेदरलँड्सचा संघ केवळ ११४ रन्स करून शकला. दीप्ती शर्मा आणि श्री चरणीने शानदार गोलंदाजी केली. मात्र या सामन्यात दीप्ती शर्माने एक विकेट घेताच एका नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. दीप्ती शर्माने झूलन गोस्वामीचा रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
दीप्ती शर्माने कालच्या सामन्यात १ विकेट पटकावळी. यानंतर तिने झूलन गोस्वामीचा सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्डची बरोबरी केली आहे. दीप्ती शर्माने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३५५ विकेट्स घेतल्या आहेत. झूलन गोस्वामीच्या रेकॉर्डची बरोबरी दीप्तीने केली आहे. सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये गोस्वामी आणि दीप्ती शर्माच्या प्रत्येकी ३५५ विकेट्स झाल्या आहेत. अजून एक विकेट घेताच दीप्ती शर्मा झूलन गोस्वामीचा रेकॉर्ड मोडणार आहे.
Deepti Sharma: 5 विकेट्स घेत दीप्ती शर्माचा रेकॉर्ड्सचा पाऊस, T20 सर्वाधिक बळी घेणारी महिला खेळाडू
सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर?
झूलन गोस्वामी – ३५५
दीप्ती शर्मा – ३५५
एलिस पेरी – ३३२
शबनम इस्माईल – ३१८
5 विकेट्स घेत दीप्ती शर्माचा रेकॉर्ड्सचा पाऊस
भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक २०२६ ची सुरुवात विजयाने केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला. स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माच्या अविस्मरणीय गोलंदाजीने पाकिस्तानवरील भारताच्या प्रभावी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे तिला सामनावीर पुरस्कार मिळाला.
IND Vs AFG Live: महाविजय! भारताने १७० रन्सने केला अफगणिस्तानचा पराभव, मालिका घातली खिशात
दीप्ती शर्माने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १० धावा देत ५ बळी घेतले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वीचा विक्रम झुलन गोस्वामीच्या नावावर होता. तिने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ धावांत ५ बळी घेतले होते. महिला टी-२० विश्वचषकातील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. ५० षटकांच्या वर्ल्ड कपमध्येही मागच्या वर्षी दीप्ती शर्माने कमालीची कामगिरी केली होती. ऑल राऊंडर असणारी दीप्ती शर्मा ही भारताची शान आहे.






