मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेचं संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे. अनिल परब हे कारवाईत हस्तक्षेप करत होते. निवाडा होण्याआधीच परबांनी निकाल जाहीर केला. राणेंना झालेली अटक बेकायदेशीर आहे. हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपा आमदार आशीष शेलार यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने अडचणीत सापडलेल्या राणे यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र, याचिकेत फक्त नाशिक येथील गुन्ह्यांचा समावेश असल्याने यासंदर्भात पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नसल्याची हमी सरकारने दिली.
राणे यांच्या वतीने अॅड. अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन नाशिकचा गुन्हा रद्द करावा अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एन. जे जमादार यांच्या खंडपीठासमोर बुधवारी तातडीने सुनावणी पार पडली.
याचिकाकर्त्यांना महाड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक होऊन जामीनही मिळाला असल्याने या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारच्यावतीने अॅड. अमित देसाई यांनी केली. तसेच राणे यांनी पुढील सुनावणीपर्यत राज्य सरकारविरोधात कोणतेही आक्षेपार्ह विधान करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.
मात्र, त्यास राणे यांनी साफ नकार दिला. तेव्हा, राणे यांच्याविरोधात तूर्तास कोणतीही कारवाई केली जाणार नाही अशी हमी देताना पुढील सुनावणीपर्यंत राणे यांना अन्य पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात चौकशीस हजर राण्याची आवश्यकता नसल्याचे राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, राणेंनी जामीनाच्या अटीशर्ती पूर्ण करणे बंधनकारक असेल असेही स्पष्ट केले त्याची दखल घेत खंडपीठाने याचिकेची सुनावणी 17 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]
read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार https://www.navarashtra.com/latest-news/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732.html”]
[read_also content=”मुंबईहून दीड ते पावणे दोन तासांत औरंगाबादला पोहचणार; मुंबई ते नागपूर धावणार बुलेट ट्रेन ! https://www.navarashtra.com/latest-news/it-will-reach-aurangabad-in-two-and-a-half-hours-from-mumbai-bullet-train-to-run-from-mumbai-to-nagpur-nrvk-170470.html”]
[read_also content=”खून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे https://www.navarashtra.com/latest-news/murderers-are-hanged-and-thieves-are-mutilated-the-most-dangerous-are-the-tabiwani-laws-nrvk-170103.html”]
[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]
[read_also content=”धावते विमान पकडण्याचा प्रयत्न! तालिबानी दहशतीने घेतला जीव; अफगाणिस्तानात विमान हवेत असताना तीन जण पडले https://www.navarashtra.com/latest-news/trying-to-catch-a-running-plane-taliban-terrorized-three-people-fell-while-the-plane-was-in-the-air-in-afghanistan-nrvk-170020.html”]
[read_also content=”चार कार पैशांनी भरल्या, हेलिकॉप्टरमध्येही पैसे कोंबले, काही पैसे रस्त्यावर पडले; अफगाणिस्तानचे राष्ट्रपती गेले कुठे? https://www.navarashtra.com/latest-news/four-cars-filled-with-money-even-in-a-helicopter-money-crashed-some-money-fell-on-the-road-where-did-the-president-of-afghanistan-go-nrvk-170034.html”]
[read_also content=”अफगानिस्तानात तालिबानी अत्याचाराचा कहर; अडकलेल्या भारतीयांचा काय करायचे? मोदी सरकारसमोरचे पाच प्रश्न https://www.navarashtra.com/latest-news/four-cars-filled-with-money-even-in-a-helicopter-money-crashed-some-money-fell-on-the-road-where-did-the-president-of-afghanistan-go-nrvk-170034.html”]
[read_also content=”अफगाणिस्तानात तालिबानी हुकूमत! पाकिस्तान, चीन, इराणचा तालिबानला पाठिंबा https://www.navarashtra.com/latest-news/taliban-rule-in-afghanistan-pakistan-china-iran-support-taliban-nrvk-170043.html”]
[read_also content=”आत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती! व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम https://www.navarashtra.com/latest-news/pooja-was-drunk-before-committing-suicide-big-revelation-in-the-viscera-report-rathores-problems-persist-nrvk-165091.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि… https://www.navarashtra.com/latest-news/19-year-old-girl-married-to-old-man-sit-will-investigate-nrvk-164601.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html”]
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]






