ईस्ट झोन विरुद्ध साऊथ झोन फायनल (फोटो- सोशल मिडिया)
दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना सुरुवातीला बंगळुरू येथील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सीलेंस’मध्ये खेळवला जाणार होता. मात्र, क्रिकेट चाहत्यांचा वाढता उत्साह आणि थेट स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याची संधी मिळावी, या उद्देशाने बीसीसीआयने या अंतिम सामन्याचे ठिकाण बदलले आहे. आता हा महामुकाबला चेन्नई येथील प्रसिद्ध एम. ए. चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे.
Duleep Trophy: महाभयानक थरार! फायनलमध्ये Kishan विरुद्ध Verma आमनेसामने; ‘या’ तारखेला भिडणार
या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे असणार आहे. वैभव सूर्यवंशी हा ईस्ट झोनचा उपकर्णधार देखील आहे. सेमीफायनलमध्ये वैभवने अत्यंत संयमी आणि आक्रमक खेळी केली होती.दुसरीकडे, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भेदक मारा करत अप्रतिम कामगिरी केली होती. आता चेपॉक (चेन्नई) येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या या खिताबी लढतीत सिराजच्या आगमनामुळे साऊथ झोनच्या गोलंदाजीला मोठी धार मिळणार आहे.
तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या साऊथ झोनकडे आता पडिक्कलच्या रूपाने फॉर्मात असलेला फलंदाज आणि सिराजच्या रूपाने अनुभवी आंतरराष्ट्रीय गोलंदाज उपलब्ध झाल्याने ईस्ट झोनच्या ईशान किशन आणि त्याच्या युवा संघाला विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
सामना कुठे रंगणार: एम. ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)
प्रमुख आकर्षण: ईशान किशन विरुद्ध तिलक वर्मा
थेट प्रक्षेपण: स्पोर्ट्स १८ (Sports18) नेटवर्कवर प्रेक्षकांना हा सामना थेट पाहता येईल.
ऑनलाईन स्ट्रीमिंग: जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाईटवर या अंतिम सामन्याचे मोफत थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.






