फोटो सौजन्य - Social Media
अखंड महाराष्ट्राचे श्रद्धा स्थान म्हणजे आपला लाडका गणपती बाप्पा! गणपती बाप्पाच्या उत्सवाचे दिवस सुरु झाले आहेत. अवघ्या महाराष्ट्रासाठी हे दिवस म्हणजे सुवर्णकाळच असतो. राज्यभरामध्ये सगळीकडे मोठ्या उत्सवामध्ये गणेशउत्सव साजरा केला जातो. खरं तर, गणेश उत्सव फक्त राज्यभरात नव्हे तर जगभर पाहायला मिळतो. अनेक देशांमध्ये तेथील भारतीय मूळ असलेले स्थायिक तसेच तेथील आपले मराठी भाषिक मोठ्या उत्साहाने बाप्पाचे स्वागत करतात. देशभरामध्ये देखील या उत्सवाची फार मोठी प्रतीक्षा केली जाते. गणेश उत्सव गणेश भाविकांसाठी जीव कि प्राण! सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या उत्सवादरम्यान एकतेचे दर्शन घडते. अनेक इतर धर्मियांना देखील बाप्पावर श्रद्धा असल्याची अनेकदा दिसून आले आहे. हा विषय श्रद्धेपेक्षा आदर भावनेचा आहे. अशा सणासुदीच्या दिवसामध्ये आदर भावनेचा दर्शन नक्कीच दिसून येते.
हे देखील वाचा : अनंत चतुर्दशीला केली जाते अनंताची पूजा
गणेशउत्सव जरी जगभर साजरी करत असले तरी महाराष्ट्रातील गणेश उत्सवाला साजरे करण्याची रीत काही औरच आहे. गणेश उत्सव महाराष्ट्राच्या संस्कृतीचा बहुमूल्य घटक आहे. एकंदरीत, महाराष्ट्राचा गणेश उत्सव महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये, खासकरून मुंबईमध्ये गणपती बाप्पाच्या मोठ्या मुर्त्या पाहायला मिळतात. सुंदर देखावे साकारले जातात. या देखाव्यांना पाहण्यासाठी तसेच बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून पाहुणे मंडळी येत असतात. राज्यामध्ये घराघरामध्ये बाप्पाला आणले जाते. मनोभावे पुजले जाते. यादरम्यान दरवर्षी बाप्पासाठी काही तरी नवीन करण्याचा ध्यास प्रत्येक घरामध्ये तसेच गणेश उत्सव मंडळांचा असतो. या निर्धाराने दरवर्षी काही तरी नवीन करण्याचे प्रयत्न केले जाते.
यादरम्यान, रिंतु राठोड या सुप्रसिद्ध मूर्तिकारांनी यंदाच्या वर्षी काही तरी हटके कल्पना केली आहे. आजच्या काळात पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शाडूच्या मातीचा गणपती तयार केला जातो. इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्तीची निर्मिती केली जाते. परंतु, रिंतु राठोड यांनी त्यापलीकडे जाऊन विचार केला आहे. त्यांनी बाप्पाच्या पूजनासहित सत्कर्म करण्याचा निर्धार केला आहे. सुखकर्त्याच्या आशीर्वादाने कुणाच्या तरी भाग्यामध्ये सुख आणण्याचे सत्कार्य रिंतु याने केले आहे.
हे देखील वाचा : सत्तरीचा भीषण दुष्काळ, गणेशोत्सव आणि त्या पार्श्वभूमीवर लिहिलेलं ‘बाप्पा मोरया रे’ गाणं
रिंतु गेल्या १० वर्षांपासून चक्क चॉकलेटचा गणपती बाप्पा तयार करत आहेत. महत्वाचे म्हणजे दरवर्षी या बाप्पाचे विसर्जन पाण्यात न करता दुधामध्ये केले जात आहे. या चॉकलेट बाप्पाचे विसर्जन दुधामध्ये केल्यानंतर ते गरीब मुलांना वाटले जाते, जेणेकरून त्यांचे पोट भरेल. त्यांच्या या कल्पेनेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.