मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा 25 फेब्रुुवारीला रिलीज होत आहे मात्र ऐन प्रदर्शनाच्यावेळीदेखील हा सिनेमा वादाच्या भोव-यात सापडला आहे. या चित्रपटाला कामाठीपुरा भागातील स्थानिक नागरिकांनी आता विरोध करायला सुरुवात केली आहे. नुकतंच या भागातील नागरीकांनी हातात बॅनर घेत चित्रपटाचा निषेध करणारी घोषणाबाजी केली आहे.
कामाठीपुराचं ज्या पद्धतीनं चित्रण या चित्रपटात केलंय ते चुकीचं असल्याचा दावा या नागरीकांचा आहे. या भागातील 42 गल्ल्यांपैकी फक्त 3 गल्ल्यांमध्येच देहविक्रयाचा व्यवसाय चालतो. मात्र चित्रपटातील दृश्यांमुळे कामाठीपुरात राहणाऱ्या नागरीकांची बदनामी होत असल्याचं या नागरीकांचं म्हणणं आहे.