मुंबई : साऊथ इंडियन सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याच्या ‘लायगर’ (Liger) या चित्रपटाची पहिली झलक ३१ डिसेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांना नवीन वर्षाची भेट म्हणून सादर करण्यात आली. (Glimpse Of Liger) या व्हिडीओमध्ये दर्शकांना एमएमए फाईट सिक्वेन्स, तसेच ‘स्लम डॉग ऑफ द स्ट्रीट्स ऑफ मुंबई’ आणि ‘चाय वाले’ यांच्या संघर्षाची झलक पाहायला मिळते.
आता या व्हिडीओने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन पुरी जगन्नाध यांनी केले आहे आणि करण जोहर, चार्मे कौर यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटाने पॅन इंडियातील अनेक रेकॉर्ड तोडले. ‘लायगर’च्या या व्हिडीओने २४ तासांत विक्रमी व्ह्यूजसह एक नवीन बेंचमार्क सेट केला आहे.
‘ग्लिम्पसे ऑफ लायगर’ या व्हिडीओने अवघ्या ७ तासात १६ दशलक्ष व्ह्यूजसह आधीचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. हा व्हिडीओ युट्युबवर ट्रेंड करत आहे. या व्हिडीओमध्ये, विजय दोन लहान परंतु प्रभावी संवाद देखील उच्चारतो. ‘आम्ही भारतीय आहोत’, हा त्याचा संवाद देशाप्रती असलेले त्याचे प्रेम दर्शवित आहे. आणि दुसरे म्हणजे, ‘वाट लगा देंगे’ हा संवाद चित्रपटातील त्याची आक्रमक वृत्ती आणि धाडसी व्यक्तिरेखा स्पष्ट करतो.
[read_also content=”…तर मुंबईत लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, रुग्णवाढीवर पालिकेची भूमिका https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/mumbai/so-there-is-no-alternative-but-lockdown-in-mumbai-the-role-of-the-municipality-on-patient-growth-217995/”]
दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांनी या बहुप्रतिक्षित पॅन इंडिया प्रकल्पात विजय देवरकोंडा याला खास स्टायलिश आणि ॲक्शन अवतारात दाखवले आहे. त्याने आक्रमकपणे विजयचे पात्र वेगळ्या आणि ट्रेंडी लूकसह बदलले आहे, त्याच्या मेकओव्हरने सर्वांनाच थक्क केले आहे.
या चित्रपटात त्यानं जगप्रसिद्ध बॉक्सर माइक टायसनसोबतही बॉक्सिंग केली आहे. बॉलिवूडमध्ये बॉक्सिंगवर आधारित अनेक चित्रपट असले तरी हा चित्रपट त्या सर्व बॉक्सिंग चित्रपटांपेक्षा वेगळा आहे. या चित्रपटाच्या चर्चेचे एक प्रमुख कारण म्हणजे बॉक्सर माईक टायसन. तो पहिल्यांदाच भारतीय चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात तो विजयच्या प्रतिस्पर्ध्याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि माइक टायसन यांच्याशिवाय अनन्या पांडे, रम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.