(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दक्षिण चित्रपटसृष्टीतील स्टार रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. ऑक्टोबरमध्ये कुटुंबाच्या उपस्थितीत गुपचूप साखरपुडा केल्यानंतर, हे जोडपे आता २०२६ मध्ये लग्न बंधनात अडकणार आहे. आता, लग्नाची तारीख आणि ठिकाण जाहीर झाले आहे. तसेच या दोघांनी अद्यापही कोणतीही माहिती दिलेली नाही आहे.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाणाबाबत, एका जवळच्या सूत्राने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, “रश्मिका आणि विजय २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमधील एका राजवाड्यात लग्न करणार आहेत. त्यांनी एक ऐतिहासिक ठिकाण निश्चित केले आहे. साखरपुड्याप्रमाणेच, लग्न खाजगी ठेवण्याची योजना आहे, ज्यामध्ये फक्त त्यांचे जवळचे मित्र उपस्थित राहणार असल्याचे समजले आहे.”
रश्मिका आणि विजयचा ऑक्टोबरमध्ये साखरपुडा
रश्मिका आणि विजयने दसऱ्याच्या एक दिवसानंतर ३ ऑक्टोबर २०२५ रोजी हैदराबादमध्ये साखरपुडा केला. विजयच्या टीमने एचटीला सांगितले की, दोघांपैकी कोणीही या बातमीला दुजोरा दिला नाही. त्यावेळी त्यांनी हे जोडपे फेब्रुवारीमध्ये लग्न करणार असल्याचीही पुष्टी केली. रश्मिका आणि विजयच्या साखरपुड्याला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. परंतु, विजयने “द गर्लफ्रेंड” चित्रपटाच्या इव्हेंटदरम्यान रश्मिकाच्या हाताला सार्वजनिक किस केले. हे लक्षात घेण्यासारखे आहे.
भारतीला पहिल्यांदाच जाणवले Post Partum Effect, ‘काजू’च्या जन्मानंतर होतोय त्रास, हर्ष घेतोय काळजी
दोन चित्रपटांमध्ये केले एकत्र काम
रश्मिका आणि विजय यांनी २०१८ मध्ये “गीता गोविंदम” चित्रपटात काम केले. त्यानंतर ते २०१९ मध्ये “डियर कॉम्रेड” मध्ये पुन्हा एकत्र दिसले. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा पसरत आहेत. चाहत्यांचा दावा आहे की ते एकत्र सुट्टीवर जातात, परंतु त्यांचे फोटो वेगळे पोस्ट करतात. तसेच अनेक चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.






