सध्या सगळीकडे सणांमुळे उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्री आणि दसऱ्यामुळे मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे व्यापाऱ्यांनाही पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळाले आहे. एका सर्वेक्षणानुसार भारतीय नागरिक दिवाळी शॉपिंगसाठी (Diwali Shopping) सर्वसाधारणपणे २१ हजार रुपये खर्च करण्याच्या तयारीत आहे. अशातच २८ ऑक्टोबर रोजी आलेला गुरुपुष्यामृत योग (Gurupushyamrut Yoga 2021)खरेदीसाठी हा खूप चांगला मुहूर्त आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व(Importance Of Guru Pushya Yoga), बाजारात काय फरक दिसून येईल याविषयी जाणून घेऊयात.
पुष्य नक्षत्र का महत्त्वाचे ?
पृथ्वीभोवती फेरी मारताना चंद्राच्या वाटेवर दिसणाऱ्या ताऱ्यांना नक्षत्र म्हणतात.ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्रांचा आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होतो. एकूण २७ नक्षत्र आहेत त्यात पुष्य सगळ्यात चांगलं नक्षत्र आहे.पुष्य नक्षत्रामध्ये सुरु केलेल्या सगळ्या कामांना यश मिळते, असे मानले जाते.
६७७ वर्षांनी दुर्मिळ योग
जर गुरुवारी पुष्य नक्षत्राचा योग असेल तर त्याला सिद्ध योग म्हटले जाते. यावर्षी दिवाळीच्या आधी २८ ऑक्टोबर २०२१ ला पुष्य नक्षत्राचा योग आहे. यावेळी ज्या ग्रहदशेमध्ये पुष्य नक्षत्राचा योग येत आहे तो योग साधारणपणे ६७७ वर्षांनी येत आहे. याआधी असा योग ५ नोव्हेंबर १३४४ ला आला होता. त्यावेळी गुरु – शनि युती मकर राशीमध्ये होऊन पुष्य योग गुरुवारी आला होता.
[read_also content=”दिवाळीच्या खरेदीसाठी उडाली झुंबड – सोशल डिस्टन्सिंगचा विसर, मास्क आणि सॅनिटायझरच्या विक्रीतही घट https://www.navarashtra.com/latest-news/people-started-diwali-shopping-but-forgot-about-mask-and-sanitizer-nrsr-195957.html”]
दिवसभर राहणार नक्षत्राचा प्रभाव
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर २०२१ ला दिवसभर पुष्य नक्षत्राचा प्रभाव राहिल. या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करणे किंवा कोणती गुंतवणूक करणे चांगले असते. त्याचा चांगला लाभ होतो.पुष्य नक्षत्र असलेल्या अशा गोष्टींची खरेदी करावी ज्या तुम्हाला दिर्घकाळ वापरायच्या आहेत. गुरु पिवळ्या वस्तूंचा कारक ग्रह असल्याने सोन्याची खरेदी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी शुभ मानली जाते. तसेच शनी लोखंडाचा कारक ग्रह असल्याने कार आणि बाईक खरेदीही शुभ मानली जाते. तसेच प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक, कपडे आणि भांड्यांची खरेदीपण करता येईल. गुरुपुष्यामृत योग असल्याने यादिवशी सोन्यासोबतच प्रॉपर्टी, ऑटोमोबाईल आणि ऑनलाईन विक्रीमध्ये वाढ होईल.
यावर्षी २५ टक्के जास्त विक्री होईल, असा ज्वेलर्सचा अंदाज आहे.तसेच गोल्ड बॉन्ड, डिजिटल गोल्ड, गोल्ड म्युच्युअल फंडचे व्यवहारही वाढतील.सणांच्या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाईल क्षेत्रातील विक्रीमध्ये १५ टक्के वाढ होईल. घरांची मागणीही सणांमुळे वाढण्याची शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार सणांच्या काळात ६९ हजार कोटींची ऑनलाईन विक्री होऊ शकते.