जगभरातून येणाऱ्या वेगवेगळ्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. लस(Vaccine) घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या अनेक बातम्यांनी नागरिक धास्तावले आहेत. काहींनी याबाबत अफवाही पसरवल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या(Central Health Ministry Report) राष्ट्रीय एईएफआय समितीने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण खूपच कमी असल्याचं म्हटलं आहे.
Bleeding & clotting cases following COVID vaccination in India are minuscule and in line with the expected number of diagnoses of these conditions in the country, a report submitted by the National AEFI Committee to the Ministry of Health & Family Welfare said.
— ANI (@ANI) May 17, 2021
कोविशील्ड लसीकरणानंतर एकूण ४९८ जणांचा या प्रकरणी अभ्यास करण्यात आला. आतापर्यंत रक्ताच्या गुठळ्या झाल्याची २६ प्रकरणं समोर आल्याची सांगण्यात आलं आहे. कोव्हॅक्सिन संदर्भात एकही प्रकरण समितीला आढळून आलं नाही.
[read_also content=”महाडला चक्रीवादळाचा तडाखा – १७५ घरांचे नुकसान, वीज पुरवठा आणि संपर्क यंत्रणाही बाधित https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/175-homes-affected-in-mahad-due-to-cyclone-tauktae-electricity-supply-is-also-off-nrsr-130321/”]
कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर प्रति दहा लाख प्रकरणात ०.६१ रिपोर्टींग रेट आहे. हेच प्रमाण इंग्लंडमध्ये दहा लाखांवर ४ आणि जर्मनीत दहा लाखांवर १० इतकं आहे. त्यामुळे मंत्रालयाकडून एक नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यात २० दिवसात कोणताही त्रास झाल्यास तात्काळ लसीककरण केंद्रावर जाण्यास सांगण्यात आलं आहे. समितीच्या अहवालानुसार देशात ७ एप्रिलपर्यंत एकूण ७ कोटी ५४ लाख जणांना लस देण्यात आली आहे. त्यात कोव्हिशिल्ड ६, ८६,५०,८१९ तर कोव्हॅक्सिन ६७,८४,५६२ जणांना देण्यात आली आहे.