जगभरातील शक्तिशाली पासपोर्टची यादी आता समोर आली आहे. यात अनेक देशांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सिंगापूरने सर्व देशांना मागे ठेवून पहिला क्रमांक पटकावला आहे. हेन्ले पासपोर्ट इंडेक्सच्या अलीकडील अहवालात, या पासपोर्टचे वर्णन सर्वात शक्तिशाली म्हणून करण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे येथील नागरिक 227 पैकी 195 ठिकाणी व्हिसाशिवाय प्रवेश करू शकतात. आज आम्ही तुम्हाला यातील भारताचे स्थान आणि टॉप 10 देशांची यादी सांगत आहोत.
हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार, भारताच्या पासपोर्टने 2024 मध्ये 82 वे स्थान प्राप्त केले आहे. हे स्थान 2023 च्या तुलनेत 2 अंकांनी खाली घसरलेले आहे. भारतीय पासपोर्टच्या मदतीने 58 देशांमध्ये व्हिसाशिवाय एंट्री मिळते तर शेजारी देश पाकिस्थानच्या पासपोर्टवर 33 देशामध्ये व्हिसाशिवाय एंट्री मिळू शकते. 2023 मध्ये पाकिस्तानी पासपोर्ट 106 व्या क्रमांकावर होता. तर या यादीत अफगाणिस्थान सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. जवळपास दोन दशकांपासून हेन्ले पासपोर्ट इंडेक्सने जगभरातील एकूण 227 देश आणि विविध प्रदेशांमधील प्रवासाचा मागोवा घेतला आहे. जागतिक स्तरावर व्हिसा धोरणांमधील नवीन बदलांमुळे रिअल-टाइम अपडेट्स आणि IATA कडील विशेष डेटा वापरला जातो.
हेदेखील वाचा – श्रावणात भगवान शंकराच्या दर्शनाचं भाग्य लाभणार! प्रवाशांसाठी सुवर्णसंधी, IRCTC चे नवीन पॅकेज लाँच