श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठाकला आहे. हिंदू धर्मात या महिन्याला फार महत्त्व आहे. हा महिना संपूर्णपणे भगवान शंकराला समर्पित केला जातो. या महिन्याकडे एक पवित्र महिना म्हणून बघितले जाते. श्रावणात लोक उपवास करून भावान शंकराचे नामस्मरण करत असतात. धार्मिक मान्यतेनुसार, हा महिना भगवान शंकराला फार प्रिय आहे. त्यामुळेच अनेक लोक या महिन्यात शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. या महिन्यात भगवान शिवाच्या दर्शनाने आपली इच्छापूर्ती असते. असेही मानले जाते.
तुम्हालाही या श्रावणात भगवान शिवाच्या ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायचे असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. श्रावणात भगवान शिवाच्या दर्शनासाठी भारतीय रेल्वे भाविकांसाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. आज आम्ही तुम्हाला उज्जैन ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन टूर पॅकेज आणि अनेक ऐतिहासिक मंदिर दर्शन पॅकेजबद्दल माहिती देणार आहोत.
अनेक भाविक श्रावण महिन्यात आवर्जून देशातील अनेक ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतात. या महिन्यात शंकराचे दर्शन घेतल्याने पापातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. तुम्हालाही या श्रावण महिन्यात अनेक ज्योतिर्लिंगे एकत्र पाहायची असतील तर IRCTC तुमच्यासाठी एक नवीन खास पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजद्वारे तुम्ही महाकालेश्वर, ओंकारेश्वर, नागेश्वर, सोमनाथ यासह अनेक ज्योतिर्लिंगांना भेट देऊ शकता. या पॅकेजमध्ये प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळतील आणि याची नक्की किंमत किती, अशी सर्व सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
हेदेखील वाचा – 900 वर्षांहून अधिक जुने भारतातील एक रहस्यमयी मंदिर, इथे शिवलिंगाचा रंग दिवसातून 3 वेळा बदलतो…