Masala Maggie Recipe : तुम्हीही मॅगी लव्हर्स आहात? मग ही मसाला मॅगी रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करायला हवी. याची चव तुम्हाला ही रेसिपी पुन्हा पुन्हा बनवायला भाग पाडेल.
मॅगी हा झटपट तयार होणारा पदार्थ असला तरी त्यात भारतीय मसाल्यांची चव मिसळली की साधी मॅगी आणखी स्वादिष्ट बनते. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, शिमला मिरची आणि रोजच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारे मसाले वापरून तुम्ही घरच्या घरी चटपटीत इंडियन स्टाइल मॅगी तयार करू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी ही रेसिपी कमी वेळात करता येते. भाज्या आणि मसाल्यांमुळे मॅगीला छान सुगंध, रंग आणि मसालेदार चव मिळते. चला तर मग मसाला मॅगीची झटपट आणि टेस्टी रेसिपीजाणून घेऊया.
कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला. जिरे तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून कांदा किंचित मऊ व पारदर्शक होईपर्यंत परता.
आता चिरलेला टोमॅटो, शिमला मिरची, गाजर आणि मटार घाला. सर्व भाज्या व्यवस्थित मिसळून दोन ते तीन मिनिटे परता, जेणेकरून भाज्यांचा कच्चेपणा कमी होईल.
त्यात हळद, लाल तिखट, धणेपूड आणि गरम मसाला घाला. चवीनुसार मीठ टाका आणि मसाले भाज्यांना चांगले लागतील अशा पद्धतीने एक मिनिट परता.
आता कढईत अंदाजे २ ते २.५ कप पाणी घाला. मिश्रण ढवळून पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. मॅगी जास्त कोरडी हवी असल्यास पाण्याचे प्रमाण थोडे कमी ठेवू शकता.
पाणी उकळू लागल्यानंतर मॅगीचे नूडल्स आणि त्यासोबतचा मसाला घाला. नूडल्स हलक्या हाताने ढवळत सर्व मसाला आणि भाज्यांमध्ये व्यवस्थित मिसळा.
मॅगी मध्यम आचेवर साधारण दोन ते तीन मिनिटे शिजू द्या. मध्ये एक-दोन वेळा ढवळा. नूडल्स पूर्णपणे मऊ होण्याआधी गॅस बंद केल्यास मॅगीची पोत अधिक चांगली राहते.
गॅस बंद केल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम मसाला इंडियन स्टाइल मॅगी लगेच सर्व्ह करा.