गोंदिया : शहरासह जिल्ह्यातील अनेक मार्गावर कर्णकर्कश हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणासोबत अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा परिणाम ज्येष्ठ नागरिक महिलांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. त्यात बेदरकारपणे वाहन चालवून स्टंटगिरीला ऊत आल्याने सर्वसामान्यांच्या त्रासात मोठी वाढ झाली आहे, असे असताना वाहतूक पोलिसांकडून कसलीच कारवाई होत नसल्याने अशा महाभागाला आवरणार कोण ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
[read_also content=”४८ तास लोटूनही महिलेचे शव अजूनही गवसले नाही, बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम अद्यापही सुरूच https://www.navarashtra.com/chandrapur/vidarbha/chandrapur/womans-body-still-unaccounted-for-48-hours-later-boat-search-continues-nraa-256183.html”]
अनेकदा हुल्लडबाज रस्त्यावरून एकाग्रपणे वाहन चालविणारे बघून अचानक प्रेशर हॉर्न वाजवितात. त्यामुळे, लक्ष विचलित होऊन अपघाताच्या प्रकारात घडतात. हुल्लडबाजांचे वागणे हे सर्व आपल्याकडे लक्ष जावे म्हणून असते. त्यासाठी युवकांकडून होणाऱ्या हॉर्नच्या कर्णकर्कशतेमुळे मानसिक स्थितीवर परिणाम होत आहे. या प्रकारावर मात्र, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष पाहायला मिळते. पोलिसांनी अशा प्रकारचे हॉर्न काढून जप्तीची कारवाई सुरू करावी, वाहनांच्या वेगावर मर्यादा आणावी, अशी मोहीम राबविण्याची मागणी सुज्ञ वाहनचालक व नागरिकांची आहे. त्यातही ही मोहीम सतत राबविणे गरजेचे आहे. त्यामुळे, हुल्लडबाजांना एक प्रकारची शिस्त लागेल. दुष्परिणाम टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईची भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.
[read_also content=”कारागृहाच्या अधीक्षकांना न्यायालयाने सुनावला सात दिवसांचा कारावास आणि दंडाची शिक्षा https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/the-jail-superintendent-was-sentenced-by-the-court-to-seven-days-imprisonment-and-fine-nraa-256154.html”]
पालकांनी सजग राहण्याची गरज
तरुणाईच्या बेफिकीर वृत्तीकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. आपला पाल्य अशा प्रकारचे तर कृत्य करीत नाही ना ! याविषयीचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. त्याच्या दुचाकीचा वेग व हॉर्न कसा आहे, त्याची दुचाकी चालविण्याची पद्धती व वाहतुकीचे नियम त्याच्या तोंडपाठ आहे का ? याची उलट तपासणी करायला हवी. तेव्हाच असे प्रकार थांबण्यास मदत होईल