Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय फलंदाजांना झालेय तरी काय; गोलंदाजांनी हातात आणून दिलेला सामना टीम इंडियाच्या बॅट्समनने गमावला; पाहूया सविस्तर रिपोर्ट

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आज पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांनी निराश केले. शेवटच्या दिवशी निश्चितच हातात असलेला सामना भारतीय फलंदाजांनी गमावला.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 30, 2024 | 03:16 PM
IND vs AUS 4th Test India Captain Rohit Sharma to R jadeja Indias Top Order Batting Totally Flop Let's See Detailed Indias Batting Order Report

IND vs AUS 4th Test India Captain Rohit Sharma to R jadeja Indias Top Order Batting Totally Flop Let's See Detailed Indias Batting Order Report

Follow Us
Close
Follow Us:

IND vs AUS 4th Test Melbourne Cricket Ground : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या टेस्ट सामन्यात कांगारूंनी टीम इंडियावर 184 धावांनी विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी अत्यंत कष्टाने आणून दिलेला सामना भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा हातातून गमावल्याचे चित्र या सामन्यात दिसून आले. टीम इंडियाचे दिग्गज पूर्णपणे यामध्ये अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. अगदी कर्णधार रोहित शर्मापासून ते वॉशिंग्टन सुंदरपर्यंत सर्वच फलंदाज फ्लॉप ठरले. भारतीय संघाने चौथ्या टेस्टमध्ये बॅटींग ऑर्डरची आवश्यकता पाहून अगदी 9 व्या क्रमांकापर्यंत बॅटींग ऑर्डर ठेवलेली पाहायला मिळाली. एवढे सर्व असूनही भारतीय फलंदाजी अपयशी ठरली. यामध्ये सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वाल आणि पंत सोडला तर एकही फलंदाजाने 10 चा आकडा पार केला नाही.

हातातील सामना गमावला

मेलबर्न टेस्टमध्ये अगदी शेवटच्या दिवशी सामना निर्णायक मोडवर आलेला होता. यामध्ये भारताला फार मोठे लक्ष्य नव्हते अवघ्या 340 धावांचे टार्गेट होते. टीम इंडियाची बॅटींग ऑर्डर पाहता हे लक्ष्य भारतीय संघ सहतेने पार करेल असेच वाटत होते. परंतु, भारताचे दिग्गज पुन्हा एकदा अपयशी ठरले. ज्या दिग्गज खेळाडूंकडून मोठी अपेक्षा होती, ते सर्व फलंदाजांनी आज निराश केले. यामध्ये कर्णधार रोहित शर्मापासून ते नुकताच शतक ठोकलेल्या नितीशकुमार रेड्डीसुद्धा अपयशी ठरला,

रोहित शर्मा दोन्ही डावांत अपयशी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरलाय, एक फलंदाज म्हणूनसुद्धा तो अपयशी ठरला तर कर्णधार म्हणूनसुद्धा त्याने निराश केले. या सामन्यात दोन्ही डावांमध्ये तो केवळ 12 धावा करू शकला. त्याला पुन्हा एकदा पॅट कमिन्सने शिकार बनवले. त्याच्या कॅप्टनसी मध्ये दोन्ही टेस्ट भारताच्या हातातून गेल्या. या बदल्यात बुमराहने पर्थ कसोटीमध्ये चांगली कॅप्टन्सी करीत सामना जिंकला.

विराटने केले निराश
विराट कोहली ज्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा हिरो मानला जात होते, त्यानेसुद्धा निराश केले. ऑस्ट्रेलियन मीडियाने विराट कोहलीला नको ते ब्रिद वापरून त्याची खिल्ली उडवली. परंतु, त्याला याचे उत्तर देण्याची हीच खरी वेळ होती. परंतु, तोदेखील यामध्ये अपयशी ठरला. आजसुद्धा त्याची भारताला गरज असताना तो आपली विकेट गिफ्ट देऊन आला. बाहेरच्या चेंडूला पुन्हा एकदा टच करण्याचा त्याने प्रयत्न करीत आपली विकेट मिचेल स्टार्कला देऊन आला.

गरज असताना ऋषभपंत आणि जडेजा फ्लॉप
शेवटच्या दिवशी ऋषभ पंतवर सर्वाधिक मदार असताना आणि त्याच्याकडून आशा असताना त्याने देखील निराशच केले. दोन्ही डावांमध्ये त्याने चुकीचा शॉट मारत आपली विकेट गमावली. तो स्वतःसुद्धा या चुकीबद्दल पश्चाताप व्यक्त करीत असेल. रवींद्र जडेजासुद्धा काही विशेष करू शकला नाही. शेवटच्या फळीत येऊन तो काही तरी कमाल करेल असेल वाटत होते परंतु त्यानेही आपली विकेट सोडली.

Web Title: Ind vs aus 4th test india captain rohit sharma to r jadeja indias top order batting totally flop lets see detailed indias batting order report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 03:16 PM

Topics:  

  • Australia
  • india
  • KL. Rahul
  • Ravindra Jadeja
  • Rishabh Pant
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
2

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
4

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.