मुंबई : एकिकडे कोरोनाचे संकट असताना जनतेचा जीव मेटाकुटीला आला असताना, दुसरीकडे महागाई दिवसागणिक विक्रम करत आहे. महागाईमुळं जनता त्रस्त असल्यामुळं सरकारच्या धोरणावर आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर पिचलेली जनतेच्या मनात कमालीचा रोष आहे. आता तर पट्रोल आणि डिझेल यांनी महागाईचा उच्चांक गाठला आहे. फक्त ऑक्टोबर महिन्यातील २० दिवसात पेट्रोल ४.५५ रुपये तर, डिझेल ५.०५ रुपयांनी महागले असल्यामुळं जगायचं की मरायचं? असा संतप्त सवाल जनता उपस्थित करत आहे.सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी त्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३५-३५ पैसे वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर दिल्लीत पेट्रोलची किंमत १०६.१९ रुपयांवर पोहोचली आहे आणि डिझेलची किंमत ९४.९२ रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे.
मागील २० दिवसांत १५ वेळा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या
मागील २० दिवसांत १५ वेळा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याया महिन्यातील फक्त २० दिवसात पेट्रोल आणि डिझेल १५ वेळा महाग झाले आहे. २०२१ सालच्या सुरुवातीपासून राजधानी दिल्लीत १ जानेवारी रोजी पेट्रोल ८३.९७ रुपये आणि डिझेल ७४.१२ रुपये प्रति लीटर होते. आता ते १०६.१९ रुपये आणि ९४.९२ रुपये प्रति लीटर आहे. म्हणजेच, १० महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पेट्रोल २२.२२ रुपयांनी आणि डिझेल २०.८० रुपयांनी महाग झाले आहे. या महागाईला जनता कंटाळली असून स्वत:ची गाडी वापरण्यापेक्षा सार्वजनिक वाहनाला जनता पसंती देत असल्याचे पाहयला मिळत आहे.
कच्चा तेल महागले
कच्चा तेल महागले असून, आंतरराष्ट्रीय कच्चे तेल ८५ डॉलर प्रति बॅरल पार केले आहे. यापूर्वी २०१८ मध्ये कच्चे तेल ८५ डॉलरवर पोहोचले होते. येत्या काळात कच्चे तेल ९० प्रति डॉलर पर्यंत जाऊ शकते असे तज्ञांचे मत आहे. परिणामी पेट्रोल आणि डिझेल अधिक महाग होऊ शकते. त्यामुळं भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी वाढ शकता असं बोलले जात आहे.
३२ राज्यात पेट्रोल व १६ राज्यात डिझेल १००च्या पुढे
३२ राज्यात पेट्रोल व १६ राज्यात डिझेल १०० च्या पुढे देशातील २९ राज्यांमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रति लीटर पार केले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दमण आणि दीव, छत्तीसगड, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, पुद्दुचेरी, तेलंगणा, पंजाब, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा , मिझोराम, झारखंड, गोवा, आसाम, गुजरात, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, मेघालय, दादरा आणि नगर हवेली आणि राजस्थानमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्यावर आहे. तर डिझेल मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, आंध्र प्रदेश, उड़ीसा, तेलंगाना, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, जम्मू-कश्मीर, झारखंड, केरल, कर्नाटक, गोआ, दादरा और नगर हवेली, तमिलनाडु और राजस्थान या राज्यात डिझेलने शतक पार केले आहे.
मोदी ग्लोबल ऑइल व गॅस सेक्टरच्या सीईओशी संवाद साधणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि जागतिक तेल आणि वायू क्षेत्रातील तज्ञांशी संवाद साधतील. त्यात तेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक नेत्यांचा समावेश आहे, जे या क्षेत्रातील प्रमुख मुद्द्यांवर विचार करतात आणि भारताबरोबर सहकार्य आणि गुंतवणुकीच्या संभाव्य क्षेत्रांचा शोध घेतात. पीएमओच्या म्हणण्यानुसार, ही बैठक संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.