सध्याच्या युगात आयफोनची क्रेझ जगभरात दिसून येते. तुम्ही पण आयफोन युजर्स असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. 2025 मध्ये अॅपल कंपनीकडून आयफोन 17 या सिरीजसह एक नवीन मॉडेल लॉंच करण्याच्या तयारीत आहे. या नवीन फोनमध्ये महत्त्वाचे बदल असणार आहेत. जसे की, आयफोनचे फीचर्स, बॉडी, अॅप्स असे अनेक बदल iPhone च्या नवीन मॉडेल असणार आहे. या फोनची किंमत किती असेल ते जाणून घेऊया…
द इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार, 2025 मध्ये अॅपल कंपनीकडून iPhone 17 सीरीजसह एक नवीन आणि स्लिम असा आयफोनचा नवीन मॉडेल लॉंच करणार आहेत. या नवीन फोनमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. तसेच हा फोन iPhone Pro Max पेक्षा ही महाग असू शकतो. हा नवा आयफोन सध्याच्या आयफोनपेक्षा खूपच पातळ असेल आणि त्याची बॉडी अॅल्युमिनियमची असू शकते. तसेच, या iPhone मध्ये फ्रंट कॅमेरा आणि सेन्सर्ससाठी एक छोटा कटआउट असेल आणि स्क्रीनचा आकार 6.12 इंच ते 6.69 इंच असू शकतो.
[read_also content=”Android 15 New FeaturesGoogle चे नवीन फिचर, स्मार्टफोन्सचा OTP आता अधिक सुरक्षित होणार https://www.navarashtra.com/technology/googles-new-feature-otp-for-smartphones-will-now-be-more-secure-535122.html”]
‘असा’ असू शकतो कॅमेरा
नवीन फोन विकत घेयाचं म्हटलं की, सर्वात आधी कॅमेऱ्याची वैशिष्ट्ये पाहिली जातात. iphone 17 च्या कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर, या नवीन आयफोनच्या बॅक कॅमेऱ्याची स्थिती बदलली जाऊ शकते. जसे की, मागील कॅमेरा डाव्या कोपऱ्यातून काढला जाऊ शकतो आणि फोनच्या मागील बाजूस वरच्या मध्यभागी ठेवला जाऊ शकतो. तसेच, या फोनला अॅपलचा नवीनतम A19 प्रोसेसर आणि उत्तम व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी अद्ययावत फ्रंट कॅमेरासारखी वैशिष्ट्ये मिळू शकतात.
किंमत किती?
सध्या अॅपलच्या या आयफोनसाठी वेगवेगळ्या डिझाइनच तपासणी केली जात आहे. परिणामी हा फोन उशीरा लॉन्च होण्याची शक्यता आहे. तसेच आयफोनचा नवीन मॉडेल सध्याच्या iPhone Pro Max पेक्षाही महाग असेल, ज्याची किंमत $1199 (भारतीय रुपयांमध्ये सुमारे 98,000 रुपये) असू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आयफोनची नवीन सिरीज लॉन्च झाल्यानंतर आयफोन प्लस बंद होण्याची शक्यता आहे. द इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार, आयफोन प्लसची विक्री अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. 2022 मध्ये लॉन्च केलेला iPhone Plus, त्या वापरकर्त्यांसाठी होता ज्यांना अधिक महाग प्रो मॉडेल्सऐवजी मोठ्या स्क्रीनसह फोन हवा होता. जर या अफवा खऱ्या ठरल्या तर हे नवीन अल्ट्रा-थिन आयफोन मॉडेल ॲपलच्या आयफोन लाइनअपमध्ये मोठा बदल घडवून आणू शकते.