(फोटो सौजन्य: istock)
हृदयविकाराचा झटका एक भयानक आरोग्यस्थिती आहे पण या परिस्थितीत आपण घाबरुन न जाता वेळीच यावर योग्य ते निर्णय घेऊन उपाययोजना करणं गरजेचं आहे. तुम्ही घरात एकटे असाल आणि अचानक जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला तर अशा परिस्थितीत तुम्ही लगेचच काही महत्त्वपूर्ण पाऊल उचलायचे हवेत ज्याने तुमचा जीव वाचू शकतो.
आपत्कालीन क्रमांकावर कॉल
डाॅक्टरांनी स्पष्ट केले की, तुम्हाला जर हृदयविकाराचा झटका येत असेल आणि तुम्ही घरात एकटे असाल तर वेळ पाहताच ताबडतोब आपत्कालीन क्रमांकावर कॉल करा. त्यांनी महत्त्वाची माहिती पुरवा आणि यानंतर ते स्वत: तुम्हाला व्हॅन घेऊन हाॅस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी येतील.
अॅस्पिरिनची गोळी चावा
हृदयरोगतज्ज्ञांनी स्पष्ट केले की हृदयविकाराचा झटका आल्यास तुम्ही लगेच अॅस्पिरिनची गोळी घ्या. ही गोळी डायरेक्ट गिळू नका तर दातांनी हळूहळू तिला चावून खा. औषध हृदयविकाराची तीव्रता कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदयविकाराचा झटका टळणार तर नाही पण त्याची तीव्रता कमी होऊ शकते.
घराचा दरवाज उघडा
तुम्ही एकटे असताना जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येत असेल तर त्वरील घराचे सर्व दरवाजे उघडा आणि लाईट चालू करा. असे केल्याने आजूबाजूच्यांना तुमची स्थिती समजून ते मदत करायला घरात शिरु शकतात. आपत्कालीन परिस्थितीत लोक तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकतील यासाठी दरवाजे उघडे ठेवणे चांगले.
बसा किंवा झोपा
हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर तुम्ही बेशुद्ध होऊ शकता किंवा जमिनीवर पडू शकता. अशात बेशुद्ध होऊन जोरात जमिनीवर पडल्याने डोक्याला किंवा दुसऱ्या अवयवाला गंभीर दुखापत होऊ शकते. यामुळेच आधीच सावधानता पाळत तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, छातीत कळा जाणवत असतील तर लगेच बेडवर झोपा किंवा सोफ्यावर बसा.
कुटुंब किंवा मित्रांना कॉल करा
हृदयविकाराच्या झटका हळूहळू जाणवू लागतो आणि मग आपण बेशुद्ध पडतो. तुम्हाला याची कोणतीही लक्षणे शरीरात प्रकर्शाने जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा आणि आपल्या मित्रमंडळींना किंवा कुटुंबाला तुमच्या काॅल करुन मदतीसाठी बोलावून घ्या. त्यांच्याशी फोनवर रहा जेणेकरून ते तुमच्या परिस्थितीबद्दल माहिती घेऊ शकतील.
World Cancer Day 2026: भारतातील Breast Cancer वर 4 उपचारपद्धती, जगण्याची शक्यता वाढवण्यास करतील मदत
हार्ट अटॅकची लक्षणे






