IPL मधील खेळाडूंना फ्रँचायझी कोटींचे पेमेंट कसे करते(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2026 Mini Auction : अबू धाबी येथे १६ डिसेंबर रोजी आयपीएल २०२६ चा लिलाव संपन्न झाला. या लिलावामध्ये एकूण ७७ खेळाडूंची खरेदी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये ४८ भारतीय आणि २९ परदेशी खेळाडूंचा सामाविष्ट होते. आयपीएलमधील सर्व संघांनी एकूण २१५.४५ कोटी रुपये खर्च केले असून या आयपीएलच्या मिनी लिलावात कॅमेरॉन ग्रीनने इतिहास रचला आहे. केकेआरने त्याला २५.२० कोटींना खरेदी केले आहे. ग्रीन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेश खेळाडू ठरला आहे. या लिलावात अनकॅप्ड खेळाडू प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांनी आपली छाप सोडली आहे. तसेच आता लाखो चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, फ्रँचायझी खेळाडूंना पेमेंट कसे करते? नेमकी पद्धत काय आहे? याबाबत आपण जाणून घेऊया.
बीसीसीआयकडून करार मंजूर करण्यात आल्यानंतर, तो नोंदणीकृत करण्यात येतो. करारामध्ये एकूण लिलाव किंमत, रिटेनर रक्कम, कर दायित्व, पेमेंट वेळापत्रक, करार समाप्तीच्या अटी आणि दुखापतीच्या अटी समाविष्ट केलेल्या असतात.
खेळाडूंना NEFT/IMPS/RTGS/SWIFT (विदेशी खेळाडूंसाठी) द्वारे पैसे देण्यात येतात. हे यासाठी करण्यात येते जेणेकरून प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर राहावी आणि कर देखील ओलखण्यास मदत होईल. बीसीसीआय आणि आयकर द्वारे पेमेंट सहजपणे व्यवस्थित करण्यात येऊ शकतात. आयपीएलमध्ये रोख पेमेंट करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
जर आयपीएल दरम्यान एखादा खेळाडू जखमी झाला तर फ्रँचायझी खेळाडूला आंशिक पेमेंट देखील करते किंवा विमा कंपनी खेळाडूला पेमेंट करते. पेमेंट हे दुखापतीच्या वेळेवर आणि कराराच्या अटींवर देखील आधारित असते.






