Sachin Pilgaonkar यांना Mahaguru का म्हंटले जाते?
Saali Mohabbat: राधिकाने शेअर केला मनीष मल्होत्रासोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली “मी खूप भारावून…”
अनेक वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवर एका पेक्षा एक हा रिॲलिटी शो चांगलाच गाजला. या शोमध्ये सचिन पिळगावकर हे मुख्य परिक्षक होते. तसेच, या शोमध्येच त्यांना महागुरु हे नाव पडले. सध्या, याच नावाने त्यांना सोशल मिडियावर ट्रोल देखील केले जाते.
सोशल मिडियावरील ट्रोलिंगवर पिळगावकरांनी काही महिन्यांपूर्वी भाष्य केले होते. ते म्हणतात, “महागुरु हे नाव मी स्वत: ठेवलेलं नाही. हे नाव मला झी मराठी वाहिनीने दिले आहे. मी स्वत:ला महागुरु समजत नाही आणि मानतही नाही. मी फक्त स्वत:ला कुटुंबप्रमुख मानतो.”
सचिन पिळगावकर पुढे म्हणतात,” हे नाव आपण नको ठेवूयात असं मी त्यांना सागितलं. पण त्यांनी मला समजावून सांगितलं की हेच नाव योग्य का आहे. त्या डान्स शोमध्ये मुलांना नृत्य शिकवणारे गुरू असतील. तेही गुरूच आहेत आणि तुम्हीही गुरू आहात. त्यामुळे ते गुरू असतील, पण त्यांच्यापेक्षा वर तुम्ही आहात म्हणूनच ‘महागुरू’ हे नाव मुख्य परीक्षक म्हणून सुचवण्यात आलं.”
सुप्रिया पिळगावकर यांनीही महागुरु नावावरुन होत असलेल्या ट्रोलिंगवर भाष्य केले होते. त्या म्हणाल्या, “महागुरु ही काही पदवी नाही. हे नाव शोपुरते ठेवले गेले होते. पण आता लोकं त्यावरुन अनावश्यक ट्रोल करतात.”






