'हिजाब' वाद नडला! मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी (Photo Credi t- X)
सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल
नितीश कुमार यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलीस महासंचालक (DGP) आणि अतिरिक्त महासंचालक (SSG) यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आले. विशेष सुरक्षा गटाला मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणासाठी अधिक सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. आता केवळ निवडक आणि उच्च-प्रोफाइल व्यक्तींनाच मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाण्याची परवानगी असेल. राज्यातील सर्व एसएसपी (SSP) आणि पोलीस अधीक्षकांना (SP) आपापल्या भागात विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
The Bihar government has significantly intensified the security cover for Chief Minister Nitish Kumar following the widespread political uproar surrounding the recent hijab incident. Citing potential threats and the volatile atmosphere created by polarized reactions, intelligence… pic.twitter.com/aW2G2Fgx57 — The Daily Guardian (@DailyGuardian1) December 18, 2025
सोशल मीडियावरून धमक्या आणि गुप्तचर अहवाल
गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, हिजाब प्रकरणानंतर काही कट्टरपंथी आणि समाजकंटक घटकांमध्ये मोठा संताप आहे. सोशल मीडियावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, सार्वजनिक कार्यक्रम आणि त्यांच्या प्रवासादरम्यानचा सुरक्षा ताफा अधिक मजबूत करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
सोशल मीडियावर नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यावरून हा सर्व वाद निर्माण झाला. एका सरकारी कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार मुस्लिम महिला डॉक्टरांना नियुक्ती पत्र देत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अचानक त्या महिला डॉक्टरच्या चेहऱ्यावरून हिजाब काढला. मंचावर उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. या कृतीमुळे मुस्लिम समुदायातून आणि विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, याच रागातून मुख्यमंत्र्यांना धमक्या मिळत असल्याचे बोलले जात आहे.
‘हा अपमान आहे, बिनशर्त माफी मागा!’ – झायरा वसीम
बॉलिवूड फेम ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने अतिशय संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या झायराने (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आणि नितीश कुमार यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली. एका महिलेची प्रतिष्ठा आणि शिष्टाचार हे खेळण्यासारखे खेळणे नाही, विशेषतः सार्वजनिक व्यासपीठावर नाही. एक मुस्लिम महिला म्हणून, दुसऱ्या महिलेचा बुरखा इतक्या सहजपणे खाली ओढलेला पाहणे अत्यंत अपमानजनक होते, त्यासोबत ते बेफिकीर हास्य होते. सत्ता म्हणजे सीमा ओलांडणे असे नाही. नितीश कुमार यांनी त्या महिलेची बिनशर्त माफी मागावी.






