Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ई.डी.’ला पुढे करून राज्यात सत्ताबदलाचे कारस्थान रचल्या जातयं का? वाचा फडणवीस काय म्हणाले?

विरोधकांकडून (Opposition leader) ईडीच्या (Enforcement Directorate) माध्यमातून राज्यात सत्तांतर करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 02, 2021 | 09:22 PM
‘ई.डी.’ला पुढे करून राज्यात सत्ताबदलाचे कारस्थान रचल्या जातयं का? वाचा फडणवीस काय म्हणाले?
Follow Us
Follow Us:

चंद्रपूर (Chandrapur).  विरोधकांकडून (Opposition leader) ईडीच्या (Enforcement Directorate) माध्यमातून राज्यात सत्तांतर करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. (devendra fadnavis reaction on ED’s action on maharashtra leader)

[read_also content=”धक्कादायक! म्युकरमायकोसिसचा मृत्यदर कोरोनाच्या तुलनेेत सहापट; जिल्हा शल्यचिकित्सकाच्या अहवालातून खुलासा https://www.navarashtra.com/latest-news/shocking-the-mortality-rate-of-mucomycosis-is-six-times-higher-than-that-of-corona-revealed-from-the-report-of-the-district-surgeon-nrat-150152.html”]

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मूळ गावी मूल येथे आज आले होते. परत जाताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला. ईडीच्या माध्यमातून राज्यात सत्तांतर घडविले जात आहे, असा आरोप होतोय. त्यात कितपत तथ्य आहे? असा सवाल फडणवीस यांना करण्यात आला. त्यावर ईडीच्या माध्यमातून सत्तांतर घडविण्यात येत असल्याच्या वार्ता केवळ आरोप असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

[read_also content=”नागपूर/ भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीची लहान मुलांवर प्राथमिक चाचणी सुरू; चार ठिकाणी होणार ‘क्लिनिकल ट्रायल’ https://www.navarashtra.com/latest-news/bharat-biotech-launches-kovacin-vaccine-on-young-children-clinical-trials-to-be-held-at-four-places-nrat-149943.html”]

राऊतांना जेवणच पचत नाही
यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत भाजपवर रोज काही ना काही आरोप करत असतात. त्यांना भाजपवर आरोप केल्याशिवाय जेवणच पचत नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

‘त्या’ निर्णयाचं स्वागत

राज्य सरकारने इम्पिरीकल डेटा गोळा करण्याचे काम ओबीसी आयोगाला दिलं आहे. सरकारच्या या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या संबंधाने राज्याची याचिका कायम असून हा प्रश्न मागासवर्ग आयोगाकडे द्यावा, असे मतही देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केले.

मुश्रीफ यांचा फडणवीसांवर टीका
दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठीची केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकारच उरला नसल्याचं आम्ही वारंवार सांगत होतो. तरीही तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारनेच मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.

अधिवेशनात ठराव आणणार
सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची याचिका फेटाळून लावली आहे. राज्याला आरक्षण टिकवता आलं नाही असं म्हणणारे आता गप्प का आहेत? असा सवाल करतानाच हे लोक सत्तेवर आल्यावरच इम्पिरीकल डाटा मिळणार आहे का?, असा सवालही त्यांनी केला. इम्पिरीकल डाटा मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली. (devendra fadnavis reaction on ED’s action on maharashtra leader)

Web Title: Is there a conspiracy to change power in the state by promoting enforcement directorate read what fadnavis said nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2021 | 09:22 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis
  • Enforcement Directorate
  • Imperial Data
  • maharashtra
  • mahavikas aghadi government
  • sanjay raut

संबंधित बातम्या

पुणेकरांचा मालमत्ता कराचा डेटा विकला पाच हजारांत; सल्लागार अभियंत्यावर गुन्हा दाखल
1

पुणेकरांचा मालमत्ता कराचा डेटा विकला पाच हजारांत; सल्लागार अभियंत्यावर गुन्हा दाखल

Dharashiv News : सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर डल्ला? शासकीय कार्यालयांतील कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
2

Dharashiv News : सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर डल्ला? शासकीय कार्यालयांतील कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

‘…हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला
3

‘…हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला

Mumbai News: वर्सोव्यातील पदपथ केले मोकळे! पादचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या १७ व्यावसायिकांवर बडगा
4

Mumbai News: वर्सोव्यातील पदपथ केले मोकळे! पादचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या १७ व्यावसायिकांवर बडगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.