मुंबई : बॉलिवूडचा मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्तला कॅन्सर ची लागण झाल्याचे वृत्त समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यात संजय दत्तची प्रकृती स्थिर नसल्याने त्याला मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. श्वास घेण्यात अडथळा आल्याने संजय दत्तला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं होतं. ऍडमिट केल्या नंतर त्याची कोरोनाची चाचणी केली असता ती निगेटिव आल्याने संजय दत्तच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला होता परंतु आधी तपासणीनंतर त्याला कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे.
कॅन्सरचं निदान झालं असलं तरी संजय दत्तच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं असून चित्रपट अभ्यासक कोमल नाहता यांनी याबाबत ट्विट केलं आहे. पुढील उपचारासाठी संजूबाबाला अमेरिकेला हलवण्याच्या हालचाली सुरु असल्याचं वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.