अकलूज : वाघोली (ता. माळशिरस) येथील ग्रामदैवत खंडोबा यात्रेनिमित्त शास्त्रीय वाद्यवृंद व कलाकारांची जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे यंदाही खंडोबा यात्रेचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. माढा, करमाळा, माण, सांगोला, सातारा, इंदापूर, पंढरपूर या तालुक्यातून विविध नामवंत कलाकार यावर्षीही आपली कला सादर करण्यासाठी उपस्थित राहिले होते.
यामध्ये प्रामुख्याने सनई, ढोल-ताशा, तबला, सॅक्सोफोन, क्लारिनेट या वाद्यांचा समावेश असणाऱ्या कलाकारांनी आपापल्या कौशल्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले व मैफिलीत रंग भरला. यावेळी उपस्थित कलाकारांचा सन्मान सूर्यकांत आप्पा शेंडगे, बाबूराव मिसाळ, चेअरमन दिगंबर शेंडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक शिवाजी पारसे, सदाशिव केंगार, दशरथ केंगार, अंकुश पारसे गुरुजी, नाथाजी केंगार, लक्ष्मण पारसे-सरपंच, उत्तम केंगार, दीपक केंगार, विठ्ठल गेजगे, भारत पारसे, प्रदीप केंगार यांनी परिश्रम घेतले.






