मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि उद्धव ठाकरे सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्या अडचणी काही थांबण्याचे नाव घेत नाहीएत. धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा धनंजय मुंडे (karuna dhananjay munde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackreay) फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करून मुंडेंची संपत्तीच मांडली आहे. तसेच मुंबईत आमदारांसाठी जी इमारत बांधली जात आहे, ती बांधू नये, असे म्हटले आहे.
मी एक आमदाराची पत्नी आहे. माझे पती धनंजय मुंडे मंत्री आहेत. जेव्हा माझे पती विधानपरिषद आमदार होते तेव्हा परळीमध्ये तीन बंगले, एक फार्म हाऊस, पुण्यात दोन मोठमोठे बंगले आणि मुंबईत आमचे दोन मोठमोठे फ्लॅट आहेत. एक नरीमन पॉईंटला एक सांताक्रूझला. त्यानंतरही आम्हाला सरकारी बंगला मिळाला आहे. ते जेव्हा आमदार होते तेव्हाचे हे सारे मिळवले होते. यामुळे मी सरकारला विनंती करते की, आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च का करावेत? पोलिसांच्या वस्त्या नवीन बनवा, दुरुस्त करा. जी इमारत आमदार निवासासाठी उभारली जात आहे त्यावर एवढे पैसे खर्च करण्याची काय गरज आहे? हा पैसा सामान्यांसाठी वापरा असे आवाहन त्यांनी केले आहे.
आदित्य ठाकरेंनी तीन हजार सहाशे कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्याच्या रिनोव्हेशनसाठी दिले आहेत. माझे पती विरोधी पक्षनेते होते, तेव्हा मी त्यांच्या बंगल्यावर जायचे. असे बंगले किंवा ज्या पाडून पुन्हा बांधायची गरज नाहीय त्यावर पैसे खर्च करू नका. आमदार असताना जिथे जिथे जातात तिथे जर बंगले उभे करत असतील तर त्यांच्यासाठी मनोरा बांधण्याची काय गरज. मालाडमध्ये २० बाथरुम बांधून तयार आहेत, तेथील लोक माझ्याकडे आले. मी तेथील आमदाराला पत्रही लिहिले. मलाच उलटी नोटीस पाठविण्यात आली, असे त्या म्हणाल्या. तेथील बाथरूम जाऊन मुख्यमंत्र्यांनी पहावेत, असे त्या म्हणाल्या. तेथील परिस्थिती पाहून मला चक्कर आली. बंद असलेल्या बाथरुमचे टाळे खोला, महानगरपालिकेच्या निवडणुकांची वाट पाहिली जातेय, असा आरोप केला आहे.
@dhananjay_munde @PMOIndia @supriya_sule @Dev_Fadnavis @TimesNow pic.twitter.com/VKXMbsjXmt — karuna dhananjay munde (@munde_karuna) May 18, 2021
मुंबईत काही ठिकाणी बोटीतून पाणी आणावे लागतेय. झोपडपट्टी भागात असुविधा आहेत. आमदार निवासावरील पैसा त्यावर खर्च करा असे आवाहन त्यांनी केले आहे.
दोन दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी राज्यपालांना देखील त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आणि धनंजय मुंडेकडून जिवाला धोका असल्याबाबत पत्र लिहिले आहे.