आमदार धनंजय मुंडे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मर्डरसाठी प्लॅन केल्याचा आरोप केला (फोटो - सोशल मीडिया)
Manoj Jarange Patil : बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे अनेकदा अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत असतात. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळावे म्हणून अनेक आंदोलन आणि उपोषण केली आहेत. तसेच जरांगे पाटील यांनी सत्ताधारी महायुतीबाबत अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. यानंतर आता जरांगे पाटील यांनी त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला असल्याचा गंभीर आरोप केला आहेत. तसेच जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे धनंजय मुंडे यांचे नाव घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच वाद निर्माण झाला.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांचे आमदार धनंजय मुंडे यांनी मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी माझा घातपात करण्यासाठी सुपारी दिली आहे. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. माझी आणि धनंजय मुंडे दोघांची नार्को टेस्ट करा. धनंजय मुंडे यांना माझ्या अंगावर गाडी घालायची आहे. त्यांनी मैदानात यावे. मी तयार आहे, असे थेट चॅलेंज जरांगे पाटील यांनी दिले.
हे देखील वाचा : भास्कर जाधव ठरले ‘ऑपरेशन टायगर’चे शिकार? विरोधी पक्षनेते न मिळताच घेतली शिंदेंच्या नेत्याची हॉटेलमध्ये भेट
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे यांना मला ठार मारायचे आहे. पोलिसांच्या ताब्यातील तीन आरोपींनी धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. तरीही जालना पोलीस आणि गृहमंत्रालयाने धनंजय मुंडे यांना अटक का केली नाही किंवा त्यांची चौकशी का केली नाहीमाझ्या कोर्टात सिध्द झालंय . धन्याने माझी 2.5 कोटींची सुपारी दिली आहे. मी पोलीस बंदोबस्त नाकारला आहे. फडणवीस सुध्दा त्याला सांभाळत आहेत. क्रुर माणसाला सांभाळू नका . पहिले देवेंद्र फडणवीस असे नव्हते. हे चांगलं नाही. ते क्रुर माणसांना पाठिंबा देत आहेत. फडणवीस पूर्वीसारखे वागले तर गरिबांना न्याय मिळेल, असे स्पष्ट मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : विरोधकांना उरला नाही आवाज? इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही
मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापित करण्यात आलेली शिंदे समिती नोंदी शोधत नाही, मग सरकारने ही समिती तयारच कशाला केली? कुणबी नोंदी शोधण्यापासून रोखले जात आहे. मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्रमध्ये नोंदी शोधल्या जात नाहीत. प्रमाणपत्र दिले जात नाही. काही अधिकारी अडथळा करत आहेत. तातडीने जीआरप्रमाणे नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. सातारा , पुणे , औंध संस्थानचा जीआर तातडीने काढा. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन उभा करु, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.






