बार्शी बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाची निर्विवाद सत्ता
बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत गटाने निर्विवादपणे जिंकली आहे. राऊत यांच्या गटाने विरोधी गटाचा १८-० अशा फरकाने धुव्वा उडवला. आमदार दिलीप सोपल गटाला एकही जागा मिळवता आली नाही. माजी सभापती रणवीर राऊत या मतमोजणी केंद्रात सकाळपासून ते तळ ठोकून होते.
सहकारी संस्था सुरेश गुंड ८१५, बाबा गायकवाड ७९०, विजय गरड ८०४, अभिजीत कापसे ७९८, प्रभाकर डमरे ८१८, रविकांत साळुंखे ७९१, यशवंत माने ८१३, महिला राखीव गटात मनीषा ताकभाते ८५०, सुमन पाटील ८४४, इतर मागासवर्ग संजय कुमार माळी तर विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये रामेश्वर पाटील ८२९, ग्रामपंचायत मतदारसंघात नेताजी घायतिडक ६३२, अजित बारंगुळे ६२६ यांना मते मिळाली तर अनुसूचित जाती जमाती या गटात सतीश (पप्पू) हनुमंते यांना ६२० मते तर आर्थिक दुर्बल घटक गटात सचिन बुरगुटे ६२१ आणि हमाल तोलार गजेंद्र मुकटे ७२७ मते मिळाली आहेत.
दरम्यान, सर्व निकाल घोषित झाल्यानंतर माजी आमदार राजेंद्र राऊत हे मतमोजणीच्या ठिकाणी आले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. बार्शीकरांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मोठा आहे. शहर आणि तालुका विकासाला भुकेला आहे. म्हणून यापुढे ही फक्त विकासासाठीच काम करणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
कराडमध्ये राजकीय घडामोडींना वेग
गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेते-पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांकडून पक्षबदल केले जात आहेत. असे असताना आता तासवडे विकास सेवा सोसायटीचे पॅनल प्रमुख संजय जाधव यांच्यासह चेअरमन आणि सर्व संचालकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशाने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते झालेल्या या पक्षप्रवेशामुळे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटाला मोठे खिंडार पडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश उंब्रज गटातील आमदार मनोज घोरपडे यांची राजकीय ताकद अधिक दृढ करणारा ठरला आहे.
हेदेखील वाचा : सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी लोटला जनसागर; विविध पक्ष संघटना व संस्थांच्या वतीने अभिवादन






