मुंबई : मराठी सिनेमातील दोन जीवाभावाचे मित्र म्हणजे अंकुश चौधरी (ankush chaudhari) आणि केदार शिंदे. (Kedar Shinde) केदारच्या पाठी कायम सावलीसारखा उभा राहणा-या अंकुशचा आज वाढदिवस आहे. त्यामळे केदार शिंदेने आवर्जून अंकुशसाठी फेसबुकवर एक पोस्ट लिहली आहे.
केदारने पोस्टमध्ये लिहल कि, तू माझ्या आयुष्यात असणं हे माझ्या दृष्टीने किती महत्वाचं आहे, हे दुनिया जाणते. आपण अगदी ३ वर्षाच्या वयापासूनचे मित्र. ही मैत्री इतकी घट्ट आहे की, अडीअडचणीला धावून येण्यात तूच नेहमी पहिला क्रमांक पटकावतोस. तुझ्यासोबत नाटक/मालिका/ सिनेमा केला. पण या आपल्या प्रवासात तुझ्यासाठीच खास असं करायचं राहून गेलंय. तेच या पुढच्या वर्षात हातून घडो हीच स्वामी चरणी प्रार्थना…