केदारनाथची चारधाम यात्रा जगप्रसिद्ध आहे. केदारनाथला स्वर्गाचा दर्जा देण्यात आलेला आहे. इथे दरवर्षी जगभरातील लाखो पर्यटक भेट द्यायला आणि येथील सौंदर्याचा अनुभव घ्यायला येत असतात. मागेच एका व्हिडिओमध्ये केदारनाथ यात्रेवेळी भाविकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. पायी केदारनाथला जाणाऱ्या भाविकांनी काही काळासाठी यात्रा थांबावी, असा आग्रह केला जात आहे. फक्त पायी केदारनाथला जाणाऱ्या भाविकांचीच ही स्थिती आहे. या दरम्यान आता केदारनाथचा आणखी एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धक्कादायक गोष्ट दिसली. या व्हिडिओत एका व्यक्तीने केदारनाथची सफर करताना येथील खाद्यपदार्थांची किंमत शेअर केली. मात्र ही किंमत एवढी होती की, ही किंमत ऐकून तुम्हीही डोक्याला हाथ लावाल. जे पदार्थ तुम्ही इकडे 10 रुपयांना खरेदी करता तेच केदारनाथमध्ये 30 रुपयांपर्यंत विकले जातात. या व्हिडिओत व्यक्तीने अनेक गोष्टींची किंमत दुकानदारांना विचारून सर्वांसोबत शेअर केली आहे.
व्हिडीओत व्यक्तीने चहा ते कोल्ड्रिंकपर्यंतच्या किमतीबद्दलची माहिती पुरवली आहे. यातून समजते की, येथे 10 रुपयांत मिळणारा चहा केदारनाथमध्ये अवघ्या 30 रुपयांना विकला जातो. तर 10 रुपयांची कॉफी येथे 50 रुपयांना विकली जाते. त्याचबरोबर इथे मॅगी 70 रुपये, डोसा 150 रुपये आणि कोल्ड्रिंकची एक 20 रुपयांची बॉटल 50 रुपयांना विकली जाते. पाण्याचा 20 रुपयांच्या बाटलीसाठी इथे तुम्हाला 100 रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. एका सामोशाची किंमत इथे 30 रुपये इतकी आहे. अशाप्रकारे अनेक खाण्यापिण्याच्या गोष्टींवर इथे दुपटीने पैसे आकारण्यात येत आहेत. त्यामुळे इथे फिरायला गेलात की, पाकीट रिकामे करूनच परतावे लागेल.
दरम्यान, हा व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक खाद्यपदार्थांच्या किमती जाहीर केल्यांनतर व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने यामागचे कारण स्पष्ट केले. यावेळी तो म्हणाला, डोंगरांवर सामान घेऊन येण्यासाठी मेहनत आणि लेबर कॉस्टमुळे या वस्तुंचे भाव वाढवून सांगावे लागतात. यावर एका व्यक्तीने आपली प्रतिक्रिया देत म्हटले, वैष्णदेवीमध्ये मात्र असं काही होत नाही. तर, अनेकांनी हा व्यापार असल्याचे म्हटलं आहे. दरवर्षी केदारनाथला येणारे भाविकांकडे दुसरा कोणता पर्याय नसल्याने ते खाद्यपदार्थ खरेदी करतात.