शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहिले. (फोटो - सोशल मीडिया)
Shaktipeeth highway : नांदेड : नववर्षाच्या प्रारंभ दिनाचा जल्लोष सर्वत्र साजरा होत असताना शक्तिपीठ महामार्ग कायमचा रद्द व्हावा या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने लिहिलेल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे सामूहिक इच्छा मरणाची परवानगी देण्यासाठी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यां मार्फत निवेदन सादर केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी पूर्ण व अप्पर पेनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सुपीक बागायती जमीन वाचविण्यासाठी गेली पावणेदोन वर्षे निकराचा लढा देत आहे. अर्धापूर तालुक्यातील जमिनी मधील केळी व हळद ही पिके विदेशात निर्यात होतात. अशा या समृद्ध परिसरातील शेती व शेतकरी उध्वस्त होण्याची भीती असून स्थानिक रोजगारावरही यामुळे संकट निर्माण होण्याचा धोका आहे. अशा या गंभीर संकटामुळे शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे.
हे देखील वाचा : तुमच्या मुलाला एकटं राहायला आवडतं का? घाबरू नका, कदाचित तो असू शकतो पुढचा ‘एलोन मस्क’
२०० हून अधिकाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या
या महामार्गासाठी आरेखन व मोजणी करण्याच्या उद्देशाने आलेल्या पथकास – शेतकऱ्यांनी अनेक वेळा संघटितरित्या विरोध करून परतवून लावले असूनही – शासन अजूनही मोजणीस्सठी दमनकारी मार्गाने प्रयत्नशील आहे. या निवेदनावर शक्तिपीठ महामार्ग विरोधी – कृती समितीचे समन्वयक सुभाष मोरलवार, सतीश कुलकर्णी गजानन तीमेवार, प्रमोद इंगोले, कचरू मुधळ, अधिकाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. यांच्यासह विठ्ठलराव गरुड, पराग अडकिने, प्रदीप गावंडे, ज्ञानोबा हाके, अनिल चव्हाण, बापूराव ढोरे, ईश्वर सवंडकर, दिलीप कराळे, धोंडीराम कल्याणकर, सतीश देसाई, बालाजी इंगोले, सुभाष कदम, तुकाराम खुर्दा मोजे, सोनाजी बुट्टे, माधव इंगोले, शंकर तिमेवार, सुरज मालेवार, आनंदराव नादरे, दिलीप भिसे यांच्यासह बाधित शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
हे देखील वाचा : महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट; मनसेचे दोन उमेदवार नॉट रिचेबल, कालपासून एकही फोन नाही
अपघात रोखण्यासाठी काम करावे
दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अपघातांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होत आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. वाहन अपघातांना आळा बसावा तसेच नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. यावर्षी रस्ता सुरक्षा अभियान २०२६ हे १ जानेवारी ते ३१ जानेवारी कालावधीत परिवहन या विभागामार्फत राबविण्यात येत असून, या अभियानाचा शुभारंभ आज प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे करण्यात आला.
धोकादायक वाहनामुळे होणाऱ्या अपघातावर नियंत्रण
या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले होते. तसेच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कर्डिले यानी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना दिल्या. नांदेड जिल्ह्यात डंपर व हायवा वाहनांच्या धोकादायक वाहनचालनामुळे होणाऱ्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.






