Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career News: महाज्योती अधिछात्रवृत्ती ‘या’ कारणामुळे रखडली; विद्यार्थ्यांत तीव्र नाराजी

कागदपत्र पडताळणीसाठी पूर्वी नागपूर येथेच व्यवस्था होती. यंदा विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील सात ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली; मात्र या बदलानंतरही प्रक्रिया वेगाने न होता विलंब वाढल्याची तक्रार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 14, 2026 | 08:49 PM
Career News: महाज्योती अधिछात्रवृत्ती ‘या’ कारणामुळे रखडली; विद्यार्थ्यांत तीव्र नाराजी
Follow Us
Follow Us:

प्रत्यक्ष रक्कम न मिळाल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी
विद्यार्थ्यांमध्ये पसरली तीव्र नाराजी 
अधिछात्रवृत्ती योजनेत निधीअभावी निर्माण झाली समस्या

पुणे: महाज्योती संस्थेच्या संशोधक अधिछात्रवृत्ती योजनेत (Career) निधीअभावी निर्माण झालेल्या अडचणींमुळे राज्यातील ओबीसी, भटके विमुक्त आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मंजुरीनंतरही प्रत्यक्ष रक्कम न मिळाल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सन २०२३ मध्ये जाहीर झालेल्या धोरणानुसार बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांसाठी समान निकष लागू करण्यात आले होते. मात्र, बार्टीसाठी २०० तर सारथी आणि महाज्योतीसाठी प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी असमानतेचा मुद्दा उपस्थित केला होता. या निर्णयाविरोधात विविध ठिकाणी आंदोलनांसह फुले वाडा ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला होता.

दीर्घ आंदोलनानंतर १० ऑक्टोबर २०२४ रोजी नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बार्टी आणि सारथी संस्थांना निधी वितरित करण्यात आला; मात्र महाज्योती संस्थेला अद्याप पुरेसा निधी उपलब्ध झालेला नाही. परिणामी, संबंधित विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ मिळण्यात विलंब होत आहे.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, मागील अडीच वर्षांपासूनची थकबाकी प्रलंबित असून, जुलै ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील अधिछात्रवृत्ती फेब्रुवारी २०२६ पर्यंत मिळणे अपेक्षित होते. मात्र एप्रिल मध्यापर्यंत सुमारे ९०० विद्यार्थ्यांपैकी अत्यल्प विद्यार्थ्यांनाच रक्कम प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, कागदपत्र पडताळणीसाठी पूर्वी नागपूर येथेच व्यवस्था होती. यंदा विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील सात ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली; मात्र या बदलानंतरही प्रक्रिया वेगाने न होता विलंब वाढल्याची तक्रार आहे. प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे अपुरे प्रशिक्षण आणि कार्यपद्धतीतील त्रुटींमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

महाज्योतीचे कोणतेही प्रशिक्षण बंद नाही! विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय

विद्यार्थ्यांमध्ये संभ्रंम

‘स्टायफंड शीट’ उपलब्ध करून न देणे, पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर न करणे आणि केवळ त्रुटींची माहिती देणे यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. महाज्योती प्रशासनाशी संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याची तक्रारही करण्यात येत आहे.

अधिछात्रवृत्ती वेळेवर मिळेना

दीड वर्षांपूर्वी मंजूर झालेली नोंदणी दिनांक पासूनची अधिछात्रवृत्ती मिळावी यासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत असताना मागील सहा महिन्याची अधिछात्रवृत्ती वेळेवर मिळत नाही व या बाबतची प्रक्रियेत पारदर्शकपणा नसल्याने महाज्योतीच्या विद्यार्थीच्या नशिबी केवळ प्रतीक्षाच आहे असेच म्हणावे लागेल.

महाज्योती संचालक विद्यार्थ्यांच्या कोणत्याही मेजेस व फोन प्रतिसाद देत नाहीत. नवीन संचालक रुजू झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये महाज्योतीच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. स्टायफंड शिट जनरेट न होणे व याद्या न लावने हे गैरकारभाराचे लक्षण आहे.

-बापू घुंगरगावकर  महाज्योती संशोधक विद्यार्थी

विविध अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांसाठी ‘महाज्योती’चे आर्थिक पाठबळ

पूर्वी नागपूर येथेच कागदपत्र तपासणी केली जात होती. यंदा राज्यातील सात ठिकाणी ही प्रक्रिया केली जात असताना देखील अद्याप अधिछात्रवृत्ती प्रदान करण्याची प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही. याचे खरे कारण माहीत असून योग्य वेळी या बाबतची माहिती पुराव्यांसह मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे.

-सद्दाम मुजावर महाज्योती संशोधक विद्यार्थी

Web Title: Mahajyoti scholorship stopped by less fund strong resentment among students career news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • Career News
  • pune news
  • Students

संबंधित बातम्या

Pune Grand Tour: पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या पर्वासाठी ९०० कोटींची तरतूद
1

Pune Grand Tour: पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या पर्वासाठी ९०० कोटींची तरतूद

School Uniform: गणवेशाची होणार अचानक तपासणी! गणवेशाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास पुरवठादारांवर कारवाईचे संकेत
2

School Uniform: गणवेशाची होणार अचानक तपासणी! गणवेशाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास पुरवठादारांवर कारवाईचे संकेत

‘नीट’ परीक्षेसाठी ड्रोनचा पहारा आणि कडक पोलीस बंदोबस्त; १७,७३४ विद्यार्थी देणार परीक्षा, कोचिंग क्लासेसचे पेपर्सही तपासणार
3

‘नीट’ परीक्षेसाठी ड्रोनचा पहारा आणि कडक पोलीस बंदोबस्त; १७,७३४ विद्यार्थी देणार परीक्षा, कोचिंग क्लासेसचे पेपर्सही तपासणार

‘श्रीमंत’ Dagdusheth बाप्पा ‘प्रेम मंदिरात’ विराजमान होणार; १०० फूट उंच अन्…, काय असणार खास?
4

‘श्रीमंत’ Dagdusheth बाप्पा ‘प्रेम मंदिरात’ विराजमान होणार; १०० फूट उंच अन्…, काय असणार खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.